सामाजिक न्याय विभाग फलटण तालुकाध्यक्षपदी महादेव गायकवाड यांची निवड

फलटण:
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, सातारा जिल्ह्याच्या वतीने फलटण येथील महादेव राजेंद्र गायकवाड यांची सामाजिक न्याय विभागाच्या फलटण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीचे अधिकृत पत्र जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.  
महादेव गायकवाड हे रविवार पेठ, फलटण येथील रहिवासी असून त्यांची सामाजिक क्षेत्रातील सक्रियता विचारात घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न कराल, अशी अपेक्षा व्यक्त करत बाळासाहेब पाटील यांनी त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.  
या नियुक्तीबद्दल महादेव गायकवाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून फलटण तालुक्यात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.  

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा