सामाजिक न्यायाची ‘मशाल’ पेटती ठेवण्यासाठी महादेव गायकवाड (आप्पा )तगडा शिलेदार!
फलटण:
राजकारणात लाचारी आणि दलाली करणाऱ्यांची गर्दी झालेली असताना, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी रात्रंदिवस धावून जाणाऱ्या एका खऱ्याखुऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान झाला आहे! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या फलटण तालुका अध्यक्षपदी महादेव (आप्पा) राजेंद्र गायकवाड यांची बिनतोड निवड करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते महादेव आप्पांना नियुक्तीचे अधिकृत पत्र देऊन या नव्या जबाबदारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. रविवार पेठ, फलटणचे सुपुत्र असलेले महादेव गायकवाड हे पदासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने समाजाच्या हितासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
बाळासाहेब पाटलांचा विश्वास, शरद पवारांचे विचार!
"आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची पुरोगामी विचारसरणी तालुक्यातील घराघरांत आणि तळागाळातील प्रत्येक शोषितांपर्यंत पोहोचवून पक्षसंघटना मजबूत कराल," असा ठाम विश्वास जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.
राजकीय वर्तुळात अनेकदा पदाचा वापर स्वार्थासाठी केला जातो, पण महादेव आप्पांसारखा निष्ठावंत आणि सच्चा कार्यकर्ता शरद पवारांच्या पक्षात सक्रिय झाल्यामुळे फलटणमधील बहुजन व वंचित समाजाला एक भक्कम आधार मिळाला आहे. "योग्य माणसाला योग्य वेळी मिळालेली ही योग्य संधी आहे," अशीच चर्चा सध्या संपूर्ण तालुक्यात रंगली आहे.
"तालुक्यात अन्यायाविरुद्धचा आवाज बुलंद करणार" – महादेव गायकवाड
या निवडीनंतर संपूर्ण फलटण तालुक्यातून महादेव आप्पांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपली भूमिका मांडताना गायकवाड म्हणाले, "हे केवळ पद नसून अन्यायाविरुद्ध लढण्याची जबाबदारी आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तळागाळात अधिक मजबूत करू!"
Comments
Post a Comment