सांगवीत मोरे सरपंचांचा दरारा अन् माणुसकीचा झरा!"चुकीला माफी नाही, विकासात तडजोड नाही" – विरोधकांचे खोडसाळ प्रयत्न अपुरे
सांगवी (विशेष प्रतिनिधी): "चुकीला माफी नाही आणि विकासकामांत चुकीचं काही करायचं नाही... आपल्याला कोणी छेडलं तर सोडायचं नाही!" याच रोखठोक आणि बाणेदार वृत्तीने सांगवी ग्रामपंचायतीचा कारभार हाकणारे सनी मोरे सरपंच सध्या एका बाजूला कडक शिस्त आणि दुसऱ्या बाजूला माणुसकीचा झरा म्हणून ओळखले जात आहेत. गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे धडाक्याने केली असताना, काही विघ्नसंतोषी नागरिकांकडून मात्र नाहक त्रास दिला जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. सनी मोरे सरपंचांनी पदभार स्वीकारल्यापासून सांगवी गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. रस्ते, पाणी, वीज, आणि स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लावत त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवले आहे. नियमाला धरून काम करणे आणि चुकीच्या गोष्टींना थारा न देणे ही त्यांची कार्यशैली आहे. अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहणे आणि गावात शिस्त राखणे यांमुळे त्यांचा एक वेगळाच दरारा निर्माण झाला आहे. मातीशी नातं अन् माणुसकीची जपवणूक एकीकडे प्रशासकीय कामात कडक शिस्त असली, तरी दुसऱ्या बाजूला गोरगरीब, वृद्ध आणि गरजूंसाठी सरपंचांचे हात सदैव मदतीसाठी पुढे असतात. गावातील...