Posts

राजाळे गावचे रहिवासी माजी ग्रामसेवक एम. टी.जाधव यांच्या फलटण येथील राहत्या घरी चोरी!

Image
चोरट्याने लक्ष ठेवून लग्न घरात साधला डाव! फलटण: राजाळे गावचे रहिवासी माजी ग्रामसेवक एम टी जाधव यांच्या फलटण येथील घरी एक लाख पस्तीस हजार किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली आहे. सविस्तर घटना खालील प्रमाणे. फलटण शहर पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार व दिलेल्या जबाबातून मी, महादेव तात्याबा जाधव, वय 60 वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त, मुळ रा-राजाळे, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा- गोविंद दुध डेअरी जवळ, वनदेवशेरी, पोस्ट-धुळदेव, ता. फलटण, जि. सातारा. समक्ष फलटण शहर पोलीस ठाणेस हजर राहुन देतो जबाब की मी वरील ठिकाणी सध्याचे ठिकाणी राहणेस असुन माझे घरात मी माझी पत्नी स्वाती, मुलगा श्रीधर, सुन- अश्विनी (नववधु) असे आम्ही एकत्रात राहणेस आहोत. माझे मुळ गावी मी शेतीचे कामाकरीता अधुन मधुन जात येत असतो. दिनांक 10/05/2026 रोजी माझा मुलगा श्रीधर याचे लग्न झालेले असुन घरामध्ये आम्ही सर्व लोक व पाहुने असे नव वधु वर यांचे प्रवेश केल्यानंतर सर्व कार्यक्रम झालेनंतर, माझी पत्नी स्वाती ही रात्रौ 8.30 वा. चे सुमारास बेडरुमध्ये गेली त्यावेळी तिने पाहीले की, लाकडीकपाट उघडे दिसले म्हणुन...

सर्वसामान्यांना दर्जेदार व मोफत उपचार मिळवून देण्यासाठी वैभव गिते आक्रमक; शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या बैठकीत मांडले १२ महत्त्वाचे मुद्दे

Image
बारामती (प्रतिनिधी): बारामती शहर आणि तालुक्यातील सर्वसामान्य, गोरगरीब व सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना दर्जेदार, वेळेवर आणि मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी 'नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस'चे (NDMJ) राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.  बारामती शहरातील व तालुक्यातील सर्व शासकीय रुग्णालये, तसेच 'महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना' (MJPJAY) आणि 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' (PMJAY) अंतर्गत अंगीकृत असलेल्या खाजगी रुग्णालयांची एक महत्त्वपूर्ण एकत्रित बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत वैभव गिते यांनी आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी एकूण १२ महत्त्वाचे मुद्दे प्रशासनासमोर आणि रुग्णालय प्रमुखांसमोर मांडले. गोरगरिबांना मोफत व तात्काळ उपचाराच्या सूचना बैठकी दरम्यान वैभव गिते यांनी रुग्णालयांचे संचालक आणि प्रमुखांना स्पष्ट सूचना दिल्या की, शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे. कोणत्याही गरजू रुग्णाला पैशांअभावी किंवा कागदपत्रांच्या तांत्रिक कारणांमुळे उपच...

सांगवी गावात महावितरण ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम; 'NDMG' संघटनेचा आंदोलनाचा इशारा

Image
सांगवी :सांगवी गावात गावठाण लाइन राजेकुरन फाटा वरील. महावितरणच्या ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप होत असून, याविरोधात NDMG' (नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस) संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर त्वरित कारवाई न केल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे निवेदन देणार असल्याचे बोलले आहे.  वादळी पावसात दुर्घटना घडण्याची शक्यता मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी येथील राजेकुरण बंगला परिसरात काही दिवसांपूर्वीच नवीन विद्युत वाहिनी आणि पोल (विजेचे खांब) बसवण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, हे काम पूर्ण होऊन काही दिवस उलटत नाही तोच, हे पोल आताच एका बाजूला वाकल्याचे दिसून येत आहे. सध्या आगामी काळात येणारा वादळी आणि अवकाळी पाऊस पाहता, हे निकृष्ट दर्जाचे खांब कधीही कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे परिसरात मोठी दुर्घटना घडून जीवित किंवा वित्तहानी होण्याचा धोका निर्माण होणार असल्याचे चित्र झाले आहे. ठेकेदाराच्या अशा हलगर्जीपणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये ती...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत फलटण तालुक्यात 'राजाळे' ग्रामपंचायत प्रथम!

Image
  माजी सनदी अधिकारी विश्वासराव जयवंतराव भोसले साहेबांचे अथक प्रयत्न *"आपला गाव...आपला अभिमान* फलटण (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत फलटण तालुक्यात राजाळे ग्रामपंचायतीने अत्यंत मानाचा प्रथम क्रमांक पटकावला आहे.. ग्रामपंचायतीच्या या ऐतिहासिक आणि गौरवशाली यशामुळे फलटण तालुक्यात राजाळे गावाचे नाव आणखी उंचावले असून, सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. *भोसले साहेबांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी..!* राजाळे गावाच्या या दैदिप्यमान यशामध्ये गावाचे सुपुत्र आणि माजी सनदी अधिकारी विश्वासराव जयवंतराव भोसले साहेब यांचे अथक प्रयत्न, दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि गावाप्रती असलेल्या जिव्हाळ्याचा राजाळे गावाला मोठा फायदा होत आहे. त्यांच्याच प्रेरणेने ग्रामपंचायतीने ग्रामस्थांमध्ये चळवळ निर्माण करून, विविध लोककल्याणकारी व शाश्वत विकासाच्या योजना गावात प्रभावीपणे राबवून हे यश संपादन केले आहे. ग्रामपंचायतीने प्रशासकीय पारदर्शकता, योजनांची अचूक अंम...

सोनगाव सोसायटी चेअरमन पदी राजेगटाचे श्री सुखदेव बेलदार यांची निवड

Image
सुखदेव केशव बेलदार सत्कार  सोनगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, सोनगावच्या चेअरमन पदी राजेगटाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा सर्वसामान्य सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरलेले श्री. सुखदेव केशव बेलदार यांची बिनविरोध निवड झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी माजी चेअरमन श्री. संदीप बबनराव पिंगळे यांनी पूर्वनियोजित ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा देत दिलेला शब्द पाळला आणि राजेगटातील शिस्त, निष्ठा व पारदर्शक राजकारणाची परंपरा पुन्हा अधोरेखित केली. पुढील चेअरमन पदासाठी मा. सरपंच श्री. जय्याप्पा बेलदार यांचे नाव चर्चेत असताना, “नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे” या सकारात्मक भूमिकेतून त्यांनी मोठेपणा दाखवत श्री. सुखदेव बेलदार यांना चेअरमनपदाची संधी दिली. या निर्णयाचे सभासद व ग्रामस्थांकडून विशेष स्वागत करण्यात आले. 🌸 नवनिर्वाचित चेअरमन यांचा भव्य सत्कार 🌸 नवनिर्वाचित चेअरमन श्री. सुखदेव बेलदार यांचा सत्कार हा महाराष्ट्र विधानपरिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब), श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (चेअरम...

केमिकल मिश्रित विषारी दारूमुळे राजाळेत तरुणांचा जातोय बळी..?कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा बेमुदत उपोषणाचा इशारा!

Image
( प्रशासकीय अनास्थेमुळे राजाळे गावात बेकायदा धंद्यांचे पेव )  ग्रामपंचायतीचा फलटण पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला थेट इशारा फलटण : फलटण तालुक्यातील जनाई देवी तीर्थक्षेत्र असलेल्या राजाळे गावात केमिकल मिश्रित हातभट्टीची बेकायदा दारू विक्री, मटका, गुटखा, जुगार आणि गांजा यांसारख्या अवैध धंद्यांनी भयानक रूप धारण केले आहे. या विषारी दारूमुळे गावातील तरुण पिढी पूर्णपणे व्यसनाधीन झाली असून, दर पंधरा दिवसाला कोणत्या ना कोणत्या तरुणाचा या विषारी दारूमुळे किंवा दारू पिऊन प्राशन केल्यामुळे मृत्यू होण्याचे चित्र होणार की काय असे धक्कादायक नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. या गंभीर परिस्थितीबाबत राजाळे ग्रामपंचायतीने पोलीस प्रशासन आणि दारूबंदी विभागाकडे तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.  जुन्या तक्रारींवर ठोस कारवाई शून्य! राजाळे ग्रामपंचायतीने आणि ग्रामस्थांनी यापूर्वी २०२१ पासून अनेकदा लेखी तक्रारी दिल्या आहेत. यामध्ये गावठी दारू विक्रेत्यांची नावे देखील पोलीस प्रशासनाला पुरवण्यात आली होती. मात्र, पोलीस अथवा दारूबंदी (राज्य उत्पादन शुल्क) विभागाने क...

फलटण नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक मुकेश अहिवळे यांची 'म्युनिसिपल क्रेडिट सोसायटी'च्या चेअरमनपदी बिनविरोध निवड!

Image
फलटण : फलटण नगरपरिषदेचे लोकप्रिय आरोग्य निरीक्षक श्री. मुकेश विनायक अहिवळे यांची 'फलटण म्युनिसिपल सर्वंटस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. फलटण' च्या चेअरमनपदी (अध्यक्ष) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नगरपरिषद कर्मचारी वर्तुळात तसेच फलटण शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा जोरदार वर्षाव होत आहे. अशी झाली निवड प्रक्रिया! सोसायटीच्या रिक्त झालेल्या चेअरमनपदासाठी नुकतीच विशेष निवडणूक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये चेअरमनपदासाठी श्री. मुकेश विनायक अहिवळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अन्य कोणताही अर्ज न आल्याने, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अहिवळे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले. सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणार: मुकेश अहिवळे "संस्थेच्या आजवरच्या पारदर्शक आणि गतिमान कारभाराची परंपरा पुढे चालू ठेवू. सर्व सभासदांच्या हिताला आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता संस्थेच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध राहीन." — श्री. मुकेश अहिवळे (नवनियुक्त चेअरमन) नगरपरिषद कर्मचारी व शहरात आनंदाच...

राजळे गावचे माजी सरपंच सचिन भालेराव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; पूर्व भागातील बहुजनांचे नेतृत्व हरपले

Image
राजाळे: राजाळे गावचे माजी सरपंच आणि पूर्व भागातील बहुजन समाजाचे खंबीर, उमदे नेतृत्व सचिन भालेराव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात दुःखद निधन झाले. त्यांच्या या अकाली जाण्याने संपूर्ण राजाळे गावासह परिसरातील पूर्व भागावर शोककळा पसरली असून, सर्वसामान्य जनतेतून अत्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राणज्योत मालवली मिळालेल्या माहितीनुसार, सचिन भालेराव यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच राजाळे गावासह संपूर्ण पूर्व भागातील राजकीय, सामाजिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर मोठी कुऱ्हाड कोसळली आहे. एक हसमुख आणि सतत लोकांमध्ये असणारा नेता इतक्या अचानकपणे सोडून गेल्याने सर्वजण सुन्न झाले आहेत. सचिन भालेराव हे केवळ नावापुरते नेते नव्हते, तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अत्यंत सक्रिय आणि तळमळीचे कार्यकर्ते होते. सर्वसामान्य जनता, गरीब आणि बहुजन समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते अहोरात्र तत्पर असायचे. कोणाच्याही सुख-दुःखात धावून जाणे आणि लोकांच्या समस्यांना प्रशासकीय पातळीव...

साखरवाडीत दोन घरे फोडली; पोलीस चौकीत शुकशुकाट असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप

Image
फलटण तालुक्यातील साखरवाडी गावामध्ये काल मध्यरात्री अज्ञात चोरांनी दोन बंद घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चोरीची माहिती देण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी ग्रामस्थ स्थानिक साखरवाडी पोलीस चौकीत गेले असता, तिथे एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता. पोलीस प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या गस्तीचा अभाव; चोरट्यांचे फावले मिळालेल्या माहितीनुसार, चोरांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत साखरवाडीतील दोन घरे लक्ष्य केली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील मौल्यवान वस्तू लंपास केल्या. साखरवाडी ही मोठी बाजारपेठ आणि केंद्रवर्ती ठिकाण असतानाही येथे रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त (Petrolling) होत नसल्याने चोरांचे धाडस वाढले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलीस चौकी रामभरोसे; २४ तास नेमणुकीची मागणी चोरीची घटना घडल्यानंतर भयभीत झालेले नागरिक तातडीने साखरवाडी पोलीस चौकीत धाव घेतली. मात्र, चौकीला कुलूप असल्यासारखी परिस्थिती असून तिथे कोणीही पोलीस अ...

गोखळी-तांबवे गावात माती उत्खनन जोमात; तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन होणार का?

Image
उत्खनन संपल्यावर 'एटीएस' मोजणी होणार का? प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष फलटण (प्रतिनिधी): फलटण तालुक्यातील गोखळी आणि तांबवे गावच्या शिवारात सध्या मोठ्या प्रमाणावर माती पास दिल्याने उत्खनन सुरू होणार असल्याचे चित्र दिसत आहे. या उत्खननासाठी महसूल विभागाने परवानगी दिली असली, तरी प्रत्यक्ष जमिनीवर तहसीलदारांच्या आदेशातील अटी व शर्तींचे पालन केले जात आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गोखळी-तांबवे परिसरात विकासकामांसाठी किंवा खाजगी कारणांसाठी माती उपसा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खोल जादा उत्खनन केले जाते. या पार्श्वभूमीवर, महसूल विभागाने दिलेला आदेश केवळ कागदावरच राहणार की त्याची काटेकोर अंमलबजावणी होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. 'एटीएस' (ATS) मोजणीचे आव्हान नियमानुसार, उत्खनन पूर्ण झाल्यानंतर संबंधित जागेची एटीएस (Advanced Technical Survey) मोजणी होणे अनिवार्य असते. या मोजणीमुळे नक्की किती ब्रास माती उचलली गेली आणि शासनाचा किती महसूल जमा झाला, याचे स्पष्ट चित्र समोर येते. जर ही मोजणी वेळेत झाली...

सरडे गाव दोन दिवसांपासून अंधारात; महावितरणच्या कारभारावर संताप, संतप्त तरुणांचा 'अर्धनग्न' आंदोलनाचा इशारा

Image
कोकण ट्रिप करणारे लाईट साठी एकत्र येतील काय ..? की अंधार करण्याची सवय झाली ..?  सरडे (प्रतिनिधी): फलटण तालुक्यातील सरडे गाव गेल्या दोन दिवसांपासून अंधारात असून, महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातील वीज पुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, राजकीय लोकांच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी आता थेट 'अर्धनग्न मोर्चा' काढण्याचा आणि प्रसंगी नवीन राजकीय पर्याय निवडण्याचा पवित्रा घेतला आहे. राजकीय अनास्थेचा फटका मिळालेल्या माहितीनुसार, सरडे गावात गेल्या ४८ तासांपासून वीज गायब आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वीज नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र, या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि महावितरणचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तरुणांनी केला आहे. "महावितरणच्या अधिकाऱ्यांना हटवा आणि गावाला अंधारातून वाचवा," अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 'कोकण ट्रिप' वरून नागरिकांची सडकून टीका एकिकडे गाव अंधारात असताना दुसरीकडे ग्रामपंचायत सदस्य मात्र काहीच दिवस...

फलटण (ग्रामसेवक) ग्रामविकास अधिकाऱ्यांना कडक इशारा; ' ठराव सादर न केल्यास शिस्तभंग कारवाई!

Image
फलटण : प्रतिनिधी ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही, अनेक अधिकारी या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी (BDO) तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कडक शब्दांत तंबी दिली असून, मुख्यालयी राहत असल्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय नियमांनुसार, ग्रामपंचायत स्तरावरील मुख्य प्रशासकीय अधिकारी असलेल्या (ग्रामसेवक ) ग्रामविकास अधिकाऱ्यांनी गावातच राहणे आवश्यक आहे. मात्र, अनेक अधिकारी मुख्यालयी न राहता शहरातून ये-जा करतात, ज्यामुळे ग्रामस्थांची कामे वेळेत होत नाहीत अशा तक्रारी वारंवार येत होत्या. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. गोविंद अरुण मोरे यांनी वारंवार पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.   पंचायत समितीने सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याचे ठराव सादर करण्यास सांगितले होते. मात्र, प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की:   आतापर्यंत फक्त कापडगाव, चौधरीवाडी, मिरगाव आणि सांगवी या ग्रामप...

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Image
बारामती, दि. 6 मे 2026 : सत्र प्रकरण क्र. 60/2017 मध्ये माननीय सत्र न्यायालय, बारामती यांनी आरोपी चंद्रकांत भोसले व अरुणा फसगे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. हा निर्णय पुराव्यांच्या अभावामुळे व तपासातील त्रुटींमुळे देण्यात आला असून, न्यायालयाने “शंका परे सिद्धता” या तत्त्वाला प्राधान्य दिले. सदर गुन्हा यवत पोलिस स्टेशन, ता. दौंड, जि. पुणे येथे दाखल झाला होता. त्यानंतर हा खटला दौंड न्यायालयातून कमिटल होऊन बारामती येथील सत्र न्यायालयात चालू होता. अभियोजन पक्षाने भारतीय दंड संहिता कलम 375 व 376(2)(l) अंतर्गत गंभीर आरोप लावले होते. या प्रकरणात सरकार पक्षाने एकूण 11 साक्षीदार तपासले होते. तसेच पीडित ही मतिमंद असल्याने तिच्या साक्षीला न्यायालयाने महत्त्व दिले होते. तथापि, न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की साक्षीदारांच्या जबाबांमध्ये लक्षणीय विसंगती आढळून आल्या असून, तपास अधिकाऱ्यांच्या तपासातही गंभीर त्रुटी आहेत. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करता, आरोप प्रभावीपणे सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली सुसंगतता व विश्वासार्हता आढळून आली नाही. विशेष म्हणजे, DNA अहवाल सकारात्मक असला तरी तो ...

दहिवडी भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार रामभरोसे; अधिकारी मिळेनात आणि सामान्यांचे हाल थांबेनात!

Image
दहिवडी माण:तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या दहिवडी येथील 'भूमी अभिलेख कार्यालय' सध्या दप्तरदिरंगाई आणि भ्रष्टाचाराच्या चर्चेमुळे वादाच्या भोवर‍्यात असल्याच्या चर्चा सुरू आहे.  कार्यालयात अपुऱ्या अधिकारी वर्गाचे कारण पुढे करत सर्वसामान्य नागरिकांना नाहक हेलपाटे मारायला लावले जात असून, "पैसे दिल्याशिवाय काम होत नाही" अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अनेक नागरिक सातबारा, मोजणी किंवा जमिनीच्या इतर कामांसाठी मैलोन्मैल प्रवास करून कार्यालयात येतात. मात्र, "साहेब सीटवर नाहीत" किंवा "अधिकारी रजेवर आहेत" अशी उत्तरे देऊन त्यांना माघारी धाडले जाते. हातावरचे पोट असलेल्या सामान्य शेतकऱ्याला आपले हक्काचे काम करण्यासाठी दिवसाचा रोजगार बुडवून कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. कार्यालयातील दिरंगाईमागे केवळ मनुष्यबळाचा अभाव आहे की जाणीवपूर्वक केलेली अडवणूक, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, एजंटमार्फत किंवा 'काही' देवाणघेवाण केल्यास रखडलेल्या फाईल्स तत्काळ हलतात. "स्वत...

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Image
बारामती, दि. 6 मे 2026 : सत्र प्रकरण क्र. 60/2017 मध्ये माननीय सत्र न्यायालय, बारामती यांनी आरोपी चंद्रकांत भोसले व अरुणा फसगे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. हा निर्णय पुराव्यांच्या अभावामुळे व तपासातील त्रुटींमुळे देण्यात आला असून, न्यायालयाने “शंका परे सिद्धता” या तत्त्वाला प्राधान्य दिले. सदर गुन्हा यवत पोलिस स्टेशन, ता. दौंड, जि. पुणे येथे दाखल झाला होता. त्यानंतर हा खटला दौंड न्यायालयातून कमिटल होऊन बारामती येथील सत्र न्यायालयात चालू होता. अभियोजन पक्षाने भारतीय दंड संहिता कलम 375 व 376(2)(l) अंतर्गत गंभीर आरोप लावले होते. या प्रकरणात सरकार पक्षाने एकूण 11 साक्षीदार तपासले होते. तसेच पीडित ही मतिमंद असल्याने तिच्या साक्षीला न्यायालयाने महत्त्व दिले होते. तथापि, न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की साक्षीदारांच्या जबाबांमध्ये लक्षणीय विसंगती आढळून आल्या असून, तपास अधिकाऱ्यांच्या तपासातही गंभीर त्रुटी आहेत. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करता, आरोप प्रभावीपणे सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली सुसंगतता व विश्वासार्हता आढळून आली नाही. विशेष म्हणजे, DNA अहवाल सकारात्मक असला तरी तो ...

कवी सुनील साबळे यांना राज्यस्तरीय 'वामनदादा कर्डक विद्रोही कवी पुरस्कार' प्रदान

Image
इंदापूर (प्रतिनिधी): पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या नवव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, तसेच संविधान अमृत महोत्सव व सर्व महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील प्रसिद्ध कवी मा. सुनील गणपत साबळे यांना 'राज्यस्तरीय वामनदादा कर्डक विद्रोही कवी पुरस्कार २०२६' देऊन सन्मानित करण्यात आले. सुनील साबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून दलित व बहुजन चळवळीत सक्रियपणे कार्यरत आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य ते करत आहेत. त्यांच्या विद्रोही कवितांनी समाजाला जागृत करण्याचे आणि प्रशासनाला आरसा दाखवण्याचे काम केले आहे. या सोहळ्यात साबळे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या कार्यामुळे चळवळ अधिक मजबूत होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला ॲड. डॉ. केवल उके (संपादक, पुरोगामी महाराष्ट्र न्यूज), वैभवजी गीते NDMG राज्य सचिव, विकासदादा धाईंजे,  प्रशांत खरात (सह...

भांडुपचे गुणवंत कामगार राजेंद्र कांबळे यांना 'भारतीय संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्कार' प्रदान

Image
मुंबई (प्रतिनिधी): भांडुप येथील प्रसिद्ध समाजसेवक आणि गुणवंत कामगार **श्री. राजेंद्र ज्ञानदेव कांबळे** यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल **'डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्कार २०२६'** देऊन सन्मानित करण्यात आले. परळ (पूर्व) येथील एम.डी. कॉलेज जवळील सभागृहात रविवारी, ३ मे २०२६ रोजी हा दिमाखदार सोहळा पार पडला. ### **मान्यवरांच्या हस्ते गौरव** हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा **ॲड. निर्मला सावंत**, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू तथा संविधान अभ्यासक **प्रा. अक्षयजी आंबेडकर**, सुप्रसिद्ध गायक व लोकशाहीर **नंदेश विठ्ठल उमप**, बॉलिवूड अभिनेत्री **डॉ. टेरिझा** आणि **आशाताई भोईर** यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. ### **कार्याचा गौरव** राजेंद्र कांबळे यांनी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सहकार आणि आरोग्य क्षेत्रात सातत्यपूर्ण सेवा दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन 'मैत्री संस्थे'चे अध्यक्ष **श्री. सूरज भोईर** यांनी या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. कांबळे यांचा यापूर्वीही अनेक मोठ्या पुरस्क...

सरडे गावात मृत जनावरांच्या दुर्गंधीने नागरिक हैराण; प्रशासन सुस्त, आंदोलनाचा इशारा

Image
सरडे (प्रतिनिधी): येथील मुख्य चौकातील वनविभागाच्या जागेत मृत जनावरे उघड्यावर टाकली जात असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या गंभीर प्रश्नाकडे वनविभाग, महसूल आणि आरोग्य प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास 'जनआंदोलन' छेडण्याचा इशारा स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.  अस्वच्छतेचे साम्राज्य मिळालेल्या माहितीनुसार, गावातील मुख्य चौकात असलेल्या वनविभागाच्या मोकळ्या जागेचा वापर मृत जनावरे टाकण्यासाठी केला जात आहे. ही जनावरे नेमकी कोण आणि कुठून आणून टाकते, याचा शोध घेण्याऐवजी वनविभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. भरवस्तीत पसरलेल्या या दुर्गंधीमुळे लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गावातील समस्या सोडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच अधिकारी गावात फिरकत नसल्याचे चित्र आहे.   गावाचे तलाठी मुख्यालयी नसल्याने त्यांना या प्रकाराची कल्पनाच नाही. गावच्या कामकाजासाठी नेमलेला संबंधित कर्मचारी नेमका कुठे असतो, ...

विडणी ग्रामपंचायतीत ‘संविधान अमृत महोत्सव’ कार्यक्रमाला सरपंचांचा खो; ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट

Image
फलटण (प्रतिनिधी): देशभरात ‘संविधान अमृत महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, फलटण तालुक्यातील विडणी ग्रामपंचायतीत मात्र या कार्यक्रमाला गालबोट लागल्याचा प्रकार समोर आला आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय नियमानुसार ग्रामपंचायतीमध्ये संविधान अमृत महोत्सव साजरा करणे बंधनकारक होते. मात्र,  , संबंधित ग्रामविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही हा कार्यक्रम करण्यापासून रोखल्याचे समजते. एका बाजूला प्रशासन संविधानाचा गौरव करत असताना, दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधीच अशा प्रकारे आडकाठी आणत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

साखरवाडी, खामगाव , विडणी, ग्रामपंचायत ने संविधान अमृत महोत्सव साजरा न केल्याने आंदोलन ..!संविधान सप्ताह ग्रामसेवकांनी केला असेल..?

Image
NDMG..संघटनेच्या वतीने लवकरच गट विकास अधिकारी यांना निवेदन देणार ..!     ग्रामपंचायतीने संविधान अमृत महोत्सव साजरा न केल्याने खळबळ; ‘बीडीओ’ना निवेदन देणार फलटण (प्रतिनिधी): देशभर ‘संविधान अमृत महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतीने या महोत्सवाकडे पाठ फिरवल्याची जोरदार चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या या कथित उदासिनतेमुळे संविधानाप्रती असलेल्या कर्तव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, एन.डी.एम.जे. (NDMJ) संघटनेने या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासकीय आदेशानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी संविधान अमृत महोत्सव व संविधान सप्ताह साजरा करणे बंधनकारक होते. मात्र, ग्रामपंचायतीने असा कोणताही कार्यक्रम राबवला नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे. "प्रशासकीय प्रमुख म्हणून ग्रामसेवकांनी नक्की काय भूमिका बजावली? त्यांनी संविधान सप्ताह साजरा केला की नाही?" असे संतप्त सवाल आता विचारले जात आहेत. संविधानाचा सन्मान राखणे ही केवळ औपचारिकता नसून ते प्रत्येक शासकीय कार्यालयाचे कर्तव्य आहे. मोठ्या गावातील ...