सरडे गावात मृत जनावरांच्या दुर्गंधीने नागरिक हैराण; प्रशासन सुस्त, आंदोलनाचा इशारा
सरडे (प्रतिनिधी):
येथील मुख्य चौकातील वनविभागाच्या जागेत मृत जनावरे उघड्यावर टाकली जात असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या गंभीर प्रश्नाकडे वनविभाग, महसूल आणि आरोग्य प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास 'जनआंदोलन' छेडण्याचा इशारा स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
अस्वच्छतेचे साम्राज्य
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील मुख्य चौकात असलेल्या वनविभागाच्या मोकळ्या जागेचा वापर मृत जनावरे टाकण्यासाठी केला जात आहे. ही जनावरे नेमकी कोण आणि कुठून आणून टाकते, याचा शोध घेण्याऐवजी वनविभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. भरवस्तीत पसरलेल्या या दुर्गंधीमुळे लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
गावातील समस्या सोडवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच अधिकारी गावात फिरकत नसल्याचे चित्र आहे.
गावाचे तलाठी मुख्यालयी नसल्याने त्यांना या प्रकाराची कल्पनाच नाही. गावच्या कामकाजासाठी नेमलेला संबंधित कर्मचारी नेमका कुठे असतो, हे देखील ग्रामस्थांना माहित नाही.
परिसरात साथरोग पसरण्याची भीती असतानाही आरोग्य विभागाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही.
वनविभाग, तहसीलदार, तलाठी आणि आरोग्य विभाग या सर्वांनी मिळून हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. "वारंवार तक्रार करूनही जर प्रशासन जागे होणार नसेल, तर आमच्याकडे आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही," असे स्थानिक कार्यकर्त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
जनावरांची विल्हेवाट लावून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अन्यथा सरडे ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवतील
Comments
Post a Comment