सर्वसामान्यांना दर्जेदार व मोफत उपचार मिळवून देण्यासाठी वैभव गिते आक्रमक; शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या बैठकीत मांडले १२ महत्त्वाचे मुद्दे

बारामती (प्रतिनिधी):
बारामती शहर आणि तालुक्यातील सर्वसामान्य, गोरगरीब व सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना दर्जेदार, वेळेवर आणि मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी 'नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस'चे (NDMJ) राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 
बारामती शहरातील व तालुक्यातील सर्व शासकीय रुग्णालये, तसेच 'महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना' (MJPJAY) आणि 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' (PMJAY) अंतर्गत अंगीकृत असलेल्या खाजगी रुग्णालयांची एक महत्त्वपूर्ण एकत्रित बैठक नुकतीच संपन्न झाली.
या बैठकीत वैभव गिते यांनी आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी एकूण १२ महत्त्वाचे मुद्दे प्रशासनासमोर आणि रुग्णालय प्रमुखांसमोर मांडले.
गोरगरिबांना मोफत व तात्काळ उपचाराच्या सूचना
बैठकी दरम्यान वैभव गिते यांनी रुग्णालयांचे संचालक आणि प्रमुखांना स्पष्ट सूचना दिल्या की, शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे. कोणत्याही गरजू रुग्णाला पैशांअभावी किंवा कागदपत्रांच्या तांत्रिक कारणांमुळे उपचारापासून वंचित ठेवले जाऊ नये. सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना विनाभेदभाव, दर्जेदार आणि संपूर्ण मोफत उपचार मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार असून, रुग्णालयांनी यात कोणतीही हलगर्जीपणा करू नये, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

बड्या हॉस्पिटल्सनी दिले अंमलबजावणीचे आश्वासन

वैभव गिते यांनी मांडलेल्या १२ न्याय्य मुद्द्यांची दखल घेत बारामतीमधील नामांकित रुग्णालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यामध्ये भोईटे यांचे गिरीराज हॉस्पिटल आणि बोबडे हॉस्पिटल यांच्यासह तालुक्यातील सर्व मोठ्या खाजगी व शासकीय रुग्णालयांच्या संचालकांनी आणि प्रमुखांनी या सूचनांवर तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल, असे लेखी व तोंडी आश्वासन दिले.

"गोरगरीब रुग्णांची पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही"

"बारामती शहर आणि तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे गरजेचे आहे. शासकीय योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष रुग्णांच्या सेवेसाठी वापरल्या गेल्या पाहिजेत. आज झालेल्या बैठकीत आम्ही १२ मागण्यांचे मुद्दे मांडले आहेत. सर्व प्रमुख हॉस्पिटल्सनी यावर तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. जर रुग्णांची अडवणूक झाली, तर आम्ही कायदेशीर व जनआंदोलनाचा मार्ग स्वीकारू."

या बैठकीमुळे बारामतीमधील आरोग्य यंत्रणेत सुधारणा होण्याची चिन्हे असून, सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बैठकीला तालुक्यातील आरोग्य अधिकारी, शासकीय रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि ऍड. अमोल सोनवणे, ऍड. बापूसाहेब शीलवंत, ऍड .नवनाथ भागवत,अनिकेत मोहिते,भास्कर वाघमारे, तसेच नामांकित खाजगी हॉस्पिटल्सचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते