राजाळे गावचे रहिवासी माजी ग्रामसेवक एम. टी.जाधव यांच्या फलटण येथील राहत्या घरी चोरी!

चोरट्याने लक्ष ठेवून लग्न घरात साधला डाव!

फलटण: राजाळे गावचे रहिवासी माजी ग्रामसेवक एम टी जाधव यांच्या फलटण येथील घरी एक लाख पस्तीस हजार किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली आहे. सविस्तर घटना खालील प्रमाणे.

फलटण शहर पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार व दिलेल्या जबाबातून मी, महादेव तात्याबा जाधव, वय 60 वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त, मुळ रा-राजाळे, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा- गोविंद दुध डेअरी जवळ, वनदेवशेरी, पोस्ट-धुळदेव, ता. फलटण, जि. सातारा.

समक्ष फलटण शहर पोलीस ठाणेस हजर राहुन देतो जबाब की मी वरील ठिकाणी सध्याचे ठिकाणी राहणेस असुन माझे घरात मी माझी पत्नी स्वाती, मुलगा श्रीधर, सुन- अश्विनी (नववधु) असे आम्ही एकत्रात राहणेस आहोत. माझे मुळ गावी मी शेतीचे कामाकरीता अधुन मधुन जात येत असतो.

दिनांक 10/05/2026 रोजी माझा मुलगा श्रीधर याचे लग्न झालेले असुन घरामध्ये आम्ही सर्व लोक व पाहुने असे नव वधु वर यांचे प्रवेश केल्यानंतर सर्व कार्यक्रम झालेनंतर, माझी पत्नी स्वाती ही रात्रौ 8.30 वा. चे सुमारास बेडरुमध्ये गेली त्यावेळी तिने पाहीले की, लाकडीकपाट उघडे दिसले म्हणुन पत्नीने पुढे जावुन पाहीले असता लाकडी कपाटाचा दरवाजा उघडुन लॉकरमधील कप्यातील ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम 45,000/-रुपये असे ठेवलेल्या जागी दिसुन आले नाहीत म्हणुन पत्नीने मला आवाज देवुन बोलावुन घेतले त्यावेळी आम्हाला समजले की आमचे सोन्याचे दागिने चोरी झालेले आहेत. त्यावेळी बेडरुमध्ये अधिक पाहता आम्हास समजले की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने आमचे रहाते घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केलेबाबत आमची खात्री झाली आहे. तरी आमचे चोरीस गेले सोन्याचे दागिन्यांचे व रोख रक्कमेचे वर्णन खालीलप्रमाणे-

1) 40,000/- रु किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्यामध्ये वाट्या गोल त्यास घुंगरे असलेले काळे मनी थोडे असलेले मनीमंगळसुत्र जु. वा. कि.अ

2) 30,000/- रु किमतीचे दिड तोळे वजनाचे सोन्यामध्ये काळे मनी थोडे असलेले व त्याच्या वाट्या गोल त्यामध्ये डायमंड असलेले मनीमंगळसुत्र जु.वा.कि.अ

3) 20,000/-रु किमतीचे एक तोळे वजनाचे सोन्यामध्ये गोल आकारामध्ये पेंडेल त्यामध्ये डायमंड असलेली सोन्याची चैन 

4) 45,000/- रु 500 रु दराच्या 90 नोटा असलेली रोख रक्कम

एकूण -1,35,000/- रु.

तरी दिनांक 10/05/2026 रोजी रात्रौ 8.30 वा.चे दरम्यान मौजे गोविंद दुधडेअरी जवळ, वनदेवशेरी, पोस्ट धुळदेव ता फलटण जि सातारा येथील वरील वर्णनाचे एकुण 1,35,000/-रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे रहाते घरातुन चोरून नेले आहे. म्हणुन माझी सदर अज्ञात चोरट्याविरुध्द तक्रार आहे. असा जबाब दिला आहे. 

अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस रणवरे करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा