कवी सुनील साबळे यांना राज्यस्तरीय 'वामनदादा कर्डक विद्रोही कवी पुरस्कार' प्रदान

इंदापूर (प्रतिनिधी):
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या नवव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, तसेच संविधान अमृत महोत्सव व सर्व महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील प्रसिद्ध कवी मा. सुनील गणपत साबळे यांना 'राज्यस्तरीय वामनदादा कर्डक विद्रोही कवी पुरस्कार २०२६' देऊन सन्मानित करण्यात आले.
सुनील साबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून दलित व बहुजन चळवळीत सक्रियपणे कार्यरत आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य ते करत आहेत. त्यांच्या विद्रोही कवितांनी समाजाला जागृत करण्याचे आणि प्रशासनाला आरसा दाखवण्याचे काम केले आहे.
या सोहळ्यात साबळे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या कार्यामुळे चळवळ अधिक मजबूत होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला ॲड. डॉ. केवल उके (संपादक, पुरोगामी महाराष्ट्र न्यूज), वैभवजी गीते NDMG राज्य सचिव, विकासदादा धाईंजे,  प्रशांत खरात (सह-संपादक) आणि प्रमोद शिंदे (संचालक) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुनील साबळे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Comments

Popular posts from this blog

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते