मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत फलटण तालुक्यात 'राजाळे' ग्रामपंचायत प्रथम!

 
माजी सनदी अधिकारी विश्वासराव जयवंतराव भोसले साहेबांचे अथक प्रयत्न
*"आपला गाव...आपला अभिमान*

फलटण (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत फलटण तालुक्यात राजाळे ग्रामपंचायतीने अत्यंत मानाचा प्रथम क्रमांक पटकावला आहे.. ग्रामपंचायतीच्या या ऐतिहासिक आणि गौरवशाली यशामुळे फलटण तालुक्यात राजाळे गावाचे नाव आणखी उंचावले असून, सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
*भोसले साहेबांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी..!*

राजाळे गावाच्या या दैदिप्यमान यशामध्ये गावाचे सुपुत्र आणि माजी सनदी अधिकारी विश्वासराव जयवंतराव भोसले साहेब यांचे अथक प्रयत्न, दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि गावाप्रती असलेल्या जिव्हाळ्याचा राजाळे गावाला मोठा फायदा होत आहे. त्यांच्याच प्रेरणेने ग्रामपंचायतीने ग्रामस्थांमध्ये चळवळ निर्माण करून, विविध लोककल्याणकारी व शाश्वत विकासाच्या योजना गावात प्रभावीपणे राबवून हे यश संपादन केले आहे.

ग्रामपंचायतीने प्रशासकीय पारदर्शकता, योजनांची अचूक अंमलबजावणी आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या जोरावर हा बहुमान मिळवला आहे. या यशामध्ये ग्रामपंचायत अधिकारी श्री गुरव व त्यांची टीम, ग्रामपंचायत/ सोसायटी सदस्य, गावातील आबालवृद्धांचे सहकार्य, लोकप्रतिनिधींचे नेतृत्व, सर्व ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, मेहनत तसेच एकजूट मोलाची ठरली आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आणि परस्पर विश्वासामुळेच गावाला तालुक्यात प्रथम क्रमांकावर पोहोचवणे शक्य झाल्याची भावना ग्रामपंचायत प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

राजाळे ग्रामपंचायतीने गावाचा कायापालट करण्यासाठी विविध स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे:
 
गावात राबवलेली प्रभावी स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन.
पाणी व्यवस्थापन: पिण्याचे पाण्याचे पंपिंग हे सोलर युनिट वर केले आहे.. पाण्याचे योग्य नियोजन आणि ओढ्यातील जलसंधारणाची यशस्वी कामे.
गावात सततचे वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन: पर्यावरण रक्षणासाठी गावात मोठ्या प्रमाणावर झाडे लावले असून त्याच्या संवर्धन देखील ट्रीगार्ड लावून केले आहे..
महिला बचत गट व त्यांचे सक्षमीकरण : गावातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी कमींन्स कंपनीच्या सहाय्याने महिलांना रोजगारासाठी "प्रेरणा" युनिट चालू केले आहे..बचत गटांच्या माध्यमातून पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, म्हणून पाण्याचे एटीएम सेंटर 24 तास कार्यान्वित केले आहे.. केंद्र शासनाची मंजुरी घेऊन श्री जानाई महिला उद्योग गटाची स्थापना केली आहे..
 डिजिटल सेवा व पारदर्शकता: ग्रामस्थांना सर्व दाखले आणि शासकीय सेवा डिजिटल माध्यमांतून पारदर्शकपणे उपलब्ध करून दिले जात आहेत.
        राजकारण बाजूला ठेवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या विचाराची एकी करून गावाच्या सन्मानासाठी सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या कामामुळे हे शक्य झाले आहे असे साहेबांचे म्हणणे आहे.. केंद्र शाळेचे 3d मध्ये बांधकाम चालू आहे.. स्मार्ट पीएचसी चे काम मंजूर असून ते लवकरच चालू होत आहे.. अत्यंत आधुनिक अशी ग्रामपंचायत इमारत व सुसज्ज बैठक हॉल तयार केला आहे. एम एस आय डी सी अंतर्गत गावातील मुख्य रस्त्याचे काम ग्रामपंचायतीच्या नियोजनानुसार करण्यात आले आहे..
      गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी उच्चांकी लोकवर्गणी जमा केली होती.. गावातील ४० घरकुल लाभार्थ्यांना एक केव्हीचे ७०००० रुपये किमतीचे सोलर युनिट "अविनाश भोसले" यांच्या सीएसआर मधून देण्यात आले आहे.. सर्व शाळा अंगणवाड्या डिजिटल आहेत.. केंद्र शाळा आणि जयवंत नगर शाळेमध्ये मुलांना संगणकीय शिक्षण मिळण्यासाठी संगणक रूम तयार केल्या आहेत.. यामुळे गावातील चौथी पास मुले देखील एमएससीआयटी पास होत आहेत.. सर्व शाळा अंगणवाड्यांना २४ तास अक्वागार्डचे पिण्याचे पाणी, परसबागेसह सर्व सुविधा दिल्या आहेत. गावात १८५ कृषी सोलर युनिट असून ८२ कुटुंबांनी आपल्या घरावर सोलर युनिट बसवले आहे.. संपूर्ण गाव पुढच्या वर्षीपर्यंत सोलर करण्याचा गावाचा संकल्प आहे.. सहा जून रोजी मुख्य रस्त्यावर तसेच सरडे रोडवर हजारो झाडे लावण्याचे नियोजन केले आहे.
"आपला गाव... आपला अभिमान..! एकत्र ध्येय, समृद्ध गाव, हरीत गाव आणि समृद्ध भविष्य..!" हे उद्दिष्ट घेऊन राजाळे ग्रामपंचायत भविष्यातही अशीच आदर्श कामगिरी करीत राहील, तसेच यापुढे देखील ग्राम विकासाची चळवळ निर्माण करून निरंतर कार्य करीत राहील असे ग्रामपंचायत कार्यकारिणीने ठरवले आहे..

Comments

Popular posts from this blog

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते