सोनगाव सोसायटी चेअरमन पदी राजेगटाचे श्री सुखदेव बेलदार यांची निवड

सुखदेव केशव बेलदार सत्कार 

सोनगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, सोनगावच्या चेअरमन पदी राजेगटाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा सर्वसामान्य सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरलेले श्री. सुखदेव केशव बेलदार यांची बिनविरोध निवड झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी माजी चेअरमन श्री. संदीप बबनराव पिंगळे यांनी पूर्वनियोजित ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा देत दिलेला शब्द पाळला आणि राजेगटातील शिस्त, निष्ठा व पारदर्शक राजकारणाची परंपरा पुन्हा अधोरेखित केली.
पुढील चेअरमन पदासाठी मा. सरपंच श्री. जय्याप्पा बेलदार यांचे नाव चर्चेत असताना, “नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे” या सकारात्मक भूमिकेतून त्यांनी मोठेपणा दाखवत श्री. सुखदेव बेलदार यांना चेअरमनपदाची संधी दिली. या निर्णयाचे सभासद व ग्रामस्थांकडून विशेष स्वागत करण्यात आले.
🌸 नवनिर्वाचित चेअरमन यांचा भव्य सत्कार 🌸
नवनिर्वाचित चेअरमन श्री. सुखदेव बेलदार यांचा सत्कार हा महाराष्ट्र विधानपरिषदेचे मा. सभापती
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब),
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण),
तसेच श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर (मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा)
यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर,
श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर आणि
श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनीही शुभेच्छांचा वर्षाव करत पुढील वाटचालीस शुभाशिर्वाद दिले.
💐 या प्रसंगी उपस्थित मान्यवर 💐
या गौरव सोहळ्यास मा. सरपंच श्री. जय्याप्पा बेलदार,श्री. पोपटराव बुरुंगले,श्री. जयवंत खरात,
श्री. अजित कांबळे,प्रा. राजेश निकाळजे,श्री. राजेंद्र आडके,
श्री. संतोष गोरवे,श्री. संदीप बेलदार
तसेच ग्रामस्थ, सभासद व राजेगटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 “सहकारातून विकास… आणि विकासातून विश्वास” 
या ध्येयाने प्रेरित होत नवनिर्वाचित चेअरमन श्री. सुखदेव बेलदार यांच्या नेतृत्वाखाली सोनगाव सोसायटी अधिक सक्षम, पारदर्शक व सभासदाभिमुख कामकाज करेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
 नवनिर्वाचित चेअरमन श्री. सुखदेव केशव बेलदार यांना पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा

Comments

Popular posts from this blog

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते