राजाळे गावचे रहिवासी माजी ग्रामसेवक एम. टी.जाधव यांच्या फलटण येथील राहत्या घरी चोरी!
चोरट्याने लक्ष ठेवून लग्न घरात साधला डाव! फलटण: राजाळे गावचे रहिवासी माजी ग्रामसेवक एम टी जाधव यांच्या फलटण येथील घरी एक लाख पस्तीस हजार किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली आहे. सविस्तर घटना खालील प्रमाणे. फलटण शहर पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार व दिलेल्या जबाबातून मी, महादेव तात्याबा जाधव, वय 60 वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त, मुळ रा-राजाळे, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा- गोविंद दुध डेअरी जवळ, वनदेवशेरी, पोस्ट-धुळदेव, ता. फलटण, जि. सातारा. समक्ष फलटण शहर पोलीस ठाणेस हजर राहुन देतो जबाब की मी वरील ठिकाणी सध्याचे ठिकाणी राहणेस असुन माझे घरात मी माझी पत्नी स्वाती, मुलगा श्रीधर, सुन- अश्विनी (नववधु) असे आम्ही एकत्रात राहणेस आहोत. माझे मुळ गावी मी शेतीचे कामाकरीता अधुन मधुन जात येत असतो. दिनांक 10/05/2026 रोजी माझा मुलगा श्रीधर याचे लग्न झालेले असुन घरामध्ये आम्ही सर्व लोक व पाहुने असे नव वधु वर यांचे प्रवेश केल्यानंतर सर्व कार्यक्रम झालेनंतर, माझी पत्नी स्वाती ही रात्रौ 8.30 वा. चे सुमारास बेडरुमध्ये गेली त्यावेळी तिने पाहीले की, लाकडीकपाट उघडे दिसले म्हणुन...