क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल सरडे व प्राथमिक शाळा सरडे गावठाण मध्ये भक्तिभावात संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा संपन्न
सरडे, 17 जुलै 2026* क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल, सरडे येथे आज _श्री संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळ्याचे_ मोठ्या भक्तिभावात आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संस्कृती आणि परंपरेचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर व्हावेत तसेच त्यांच्यामध्ये विविध मूल्ये रुजावीत या उद्देशाने हा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती या सोहळ्याचे प्रास्ताविक करणारे शाळेचे क्रीडाशिक्षक _श्री आप्पासाहेब वाघमोडे_ यांनी दिली. सर्व शिक्षकांच्या नियोजनाखाली संपूर्ण सोहळा पार पडला.सोहळ्याची आरती _युथ असोसिएशन संस्थेचे चेअरमन श्री शत्रुघ्न बेलदार_, _प्राथमिक शाळा सरडे गावठाण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अशोक बेलदार_, _हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री अनिल खलाटे सर_ आणि _प्राथमिक शाळेचे श्री. गावडे सर_ यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.या प्रसंगी दोन्ही शाळांचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक शाळेतील विद्यार्थांनी विठ्ठल रुक्माई तसेच संत ज्ञानेश्वर यांचे पोशाख परिधान करून सोहळ्याची शोभा वाढविली क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी...