नितीन जगताप यांची 'साप्ताहिक सातारा सम्राट'च्या कार्यकारी संपादक पदी निवड

फलटण / साखरवाडी:
पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखणीच्या जोरावर अल्पावधीतच अढळ स्थान निर्माण केलेले 'साप्ताहिक सातारा सम्राट'चे साखरवाडी येथील धडाडीचे प्रतिनिधी नितीन जगताप यांची वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादक (Executive Editor) पदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. वृत्तपत्राचे मुख्य संपादक गोविंद अरुण मोरे यांनी नुकतीच ही घोषणा केली.
नितीन जगताप यांनी आजवर साखरवाडी परिसरासह फलटण तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय गैरकारभारावर आपल्या रोखठोक वार्तांकनातून प्रकाश टाकला आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रशासना दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने आग्रही भूमिका घेतली आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची, सचोटीची आणि पत्रकारितेतील सातत्याची दखल घेऊन त्यांना ही नवी आणि महत्त्वाची जबाबदारी बहाल करण्यात आली आहे.
या निवडीनंतर साप्ताहिक पत्रकारिता वर्तुळातून नितीन जगताप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून यापुढेही लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करत, अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास नवनियुक्त कार्यकारी संपादक नितीन जगताप यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
त्यांच्या या निवडीबद्दल 'सातारा सम्राट' परिवारासह फलटण व साखरवाडी परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा