केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणार; सचिव गोविंद मोरे यांचे आवाहन

सातारा / फलटण:
केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू दळवी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे सचिव गोविंद मोरे यांच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे.
केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात अतिशय प्रभावीपणे व निष्ठेने कार्यरत आहे. संघटनेने आजवर अनेक लोकोपयोगी प्रश्न मार्गी लावले आहेत. हाच वारसा पुढे चालवत, सर्वच क्षेत्रांमध्ये संघटनेचे काम नवीन जोमाने आणि अधिक व्यापक करण्यासाठी जुन्या व अनुभवी पदाधिकाऱ्यांसह नवीन चेहऱ्यांना सोबत घेऊन लवकरच पुढील कार्यक्रमांचे विशेष नियोजन केले जाणार आहे.
इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन:
ज्या नागरिकांना किंवा तरुणांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय राहून काम करण्याची आवड आहे, अशा सर्व इच्छुकांनी केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे सचिव गोविंद मोरे यांच्याशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
 संपर्क प्रमुख: गोविंद मोरे (सचिव, केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ)
 मोबाईल क्रमांक: ७९७२७०६१११ 
आपल्या भागातील सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यासाठी तरुण युवा मुले,मुली सह इच्छुक व्यक्ती या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा