फलटण येथे १७ जुलै रोजी 'संविधान दिंडी'चे भव्य स्वागत; प्रशासकीय व पोलीस अधिकार्‍यांना निमंत्रण

फलटण (प्रतिनिधी):
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्व ही नैतिक मूल्ये तळागाळातील लोकांपर्यंत रुजवण्यासाठी 'बार्टी पुणे' (विश्वंरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) यांच्या माध्यमातून 'संविधान दिंडी' चे आयोजन करण्यात आले आहे. फलटण येथे आगमन होणाऱ्या या दिंडीच्या भव्य स्वागत कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२६, भीमस्फूर्ती भूमी, मंगळवार पेठ, फलटण आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण स्वागत सोहळ्यासाठी फलटणचे नगराध्यक्ष, सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाला आदरपूर्वक निमंत्रण देण्यात आले आहे.

महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत गोराकुंभार, संत जनाबाई, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार इत्यादी संतांच्या विचारांची मोठी परंपरा व वारसा लाभला आहे. याच अनुषंगाने प्रतिवर्षी आळंदी ते पंढरपूरपर्यंत लाखो वारकरी 'ज्ञानोबा माउली तुकाराम' असा गजर करत दिंडीमध्ये सहभागी होतात. याच सांस्कृतिक आणि सामाजिक वैविध्याचा धागा पकडून, संविधानाची परिपूर्ण माहिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करत ही 'संविधान दिंडी' फलटण शहरात येत आहे.
कार्यक्रमाचे नियोजन:
  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण येथे 
 दिनांक व वेळ: शुक्रवार, १७ जुलै २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता.
 "प्रशासकीय व पोलीस विभागातील सर्व प्रमुख जबाबदार अधिकाऱ्यांची या कार्यक्रमातील उपस्थिती नागरिकांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी ठरेल. बहुजन समाजातील सर्व समाज बांधवांनी आणि नागरिकांनी या स्वागत सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे," असे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा