मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत फलटण तालुक्यात 'राजाळे' ग्रामपंचायत प्रथम!
माजी सनदी अधिकारी विश्वासराव जयवंतराव भोसले साहेबांचे अथक प्रयत्न *"आपला गाव...आपला अभिमान* फलटण (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत फलटण तालुक्यात राजाळे ग्रामपंचायतीने अत्यंत मानाचा प्रथम क्रमांक पटकावला आहे.. ग्रामपंचायतीच्या या ऐतिहासिक आणि गौरवशाली यशामुळे फलटण तालुक्यात राजाळे गावाचे नाव आणखी उंचावले असून, सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. *भोसले साहेबांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी..!* राजाळे गावाच्या या दैदिप्यमान यशामध्ये गावाचे सुपुत्र आणि माजी सनदी अधिकारी विश्वासराव जयवंतराव भोसले साहेब यांचे अथक प्रयत्न, दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि गावाप्रती असलेल्या जिव्हाळ्याचा राजाळे गावाला मोठा फायदा होत आहे. त्यांच्याच प्रेरणेने ग्रामपंचायतीने ग्रामस्थांमध्ये चळवळ निर्माण करून, विविध लोककल्याणकारी व शाश्वत विकासाच्या योजना गावात प्रभावीपणे राबवून हे यश संपादन केले आहे. ग्रामपंचायतीने प्रशासकीय पारदर्शकता, योजनांची अचूक अंम...