सर्वसामान्यांना दर्जेदार व मोफत उपचार मिळवून देण्यासाठी वैभव गिते आक्रमक; शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या बैठकीत मांडले १२ महत्त्वाचे मुद्दे
बारामती (प्रतिनिधी): बारामती शहर आणि तालुक्यातील सर्वसामान्य, गोरगरीब व सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना दर्जेदार, वेळेवर आणि मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी 'नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस'चे (NDMJ) राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बारामती शहरातील व तालुक्यातील सर्व शासकीय रुग्णालये, तसेच 'महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना' (MJPJAY) आणि 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' (PMJAY) अंतर्गत अंगीकृत असलेल्या खाजगी रुग्णालयांची एक महत्त्वपूर्ण एकत्रित बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत वैभव गिते यांनी आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी एकूण १२ महत्त्वाचे मुद्दे प्रशासनासमोर आणि रुग्णालय प्रमुखांसमोर मांडले. गोरगरिबांना मोफत व तात्काळ उपचाराच्या सूचना बैठकी दरम्यान वैभव गिते यांनी रुग्णालयांचे संचालक आणि प्रमुखांना स्पष्ट सूचना दिल्या की, शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे. कोणत्याही गरजू रुग्णाला पैशांअभावी किंवा कागदपत्रांच्या तांत्रिक कारणांमुळे उपच...