सांगवी गावात महावितरण ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम; 'NDMG' संघटनेचा आंदोलनाचा इशारा
सांगवी :सांगवी गावात गावठाण लाइन राजेकुरन फाटा वरील. महावितरणच्या ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप होत असून, याविरोधात NDMG' (नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस) संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर त्वरित कारवाई न केल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे निवेदन देणार असल्याचे बोलले आहे. वादळी पावसात दुर्घटना घडण्याची शक्यता मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी येथील राजेकुरण बंगला परिसरात काही दिवसांपूर्वीच नवीन विद्युत वाहिनी आणि पोल (विजेचे खांब) बसवण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, हे काम पूर्ण होऊन काही दिवस उलटत नाही तोच, हे पोल आताच एका बाजूला वाकल्याचे दिसून येत आहे. सध्या आगामी काळात येणारा वादळी आणि अवकाळी पाऊस पाहता, हे निकृष्ट दर्जाचे खांब कधीही कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे परिसरात मोठी दुर्घटना घडून जीवित किंवा वित्तहानी होण्याचा धोका निर्माण होणार असल्याचे चित्र झाले आहे. ठेकेदाराच्या अशा हलगर्जीपणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये ती...