फलटणमध्ये बुद्ध पौर्णिमा मिरवणुकीत पोलीस हस्तक्षेप; शहरात तणाव, पोलीस निरीक्षकांवर कारवाईची मागणी
फलटण (प्रतिनिधी): फलटण येथील बुद्ध पौर्णिमेनिमित्त काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मिरवणुकीत पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समिती आणि भीम अनुयायांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ मे २०२६ रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरात उत्साहात आणि शांततेत मिरवणूक सुरू होती. मिरवणूक शेवटच्या टप्प्यात असताना शंकर मार्केट परिसरात आली. यावेळी अवघे काही मिनिटे शिल्लक असताना, पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी "वेळ संपली" असे सांगत डीजेवर सुरू असलेली ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’ही वंदना जबरदस्तीने बंद करण्याचे आदेश दिले. केवळ डीजेच नव्हे, तर पारंपरिक वाद्ये वाजवण्यासही मज्जाव करण्यात आला. समितीने दिलेल्या निवेदनात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे: उपस्थित पदाधिकारी आणि नागरिकांशी पोलिसांनी अर्वाच्य आणि धमकीखोर भाषेत संवाद साधल्याचा आरोप आहे. पोलिस निरीक्षकांनी अनुसूचित जातींबाबत ...