सांगवी ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची१३५ वी जयंती उत्साहात साजरी.

सांगवी:
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती सांगवी ग्रामपंचायत कार्यालयात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. 'सामाजिक समता सप्ताहा'चे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात महामानवाच्या जीवनावर प्रबोधनात्मक व जीवनचरित्र वर मान्यवरांच्या मनोगतांचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधान ची उदेशिका ग्रहण करून अभिवादन करून करण्यात आली. यावेळी सांगवी गावचे सरपंच संतोष (सनी) मोरे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, "डॉ. बाबासाहेबांचे विचार हे प्रगतीचा मार्ग दाखवणारे आहेत. त्यांच्या समतेच्या विचारांची आज समाजाला मोठी गरज आहे."

ग्रामपंचायत अधिकारी मा. भोसले साहेब यांनीही डॉ. बाबासाहेबांच्या प्रशासकीय आणि सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला. याप्रसंगी उपस्थित विविध सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

जय भैया माने यांचे बहारदार सूत्रसंचालन:
या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन NDMJ संघटनेचे जय भैया माने यांनी केले. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील विविध पैलू उलगडून दाखवत उपस्थितांची मने जिंकली.

या सोहळ्याला सरपंच संतोष (सनी) मोरे, ग्रामपंचायत अधिकारी भोसले साहेब, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यानिमित्त सांगवी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?