फलटण सार्वजनिक बांधकाम विभागाचा 'भोंगळ' कारभार; अधिकारी नेहमीच गायब...?
हालचाल नोंद वही' (Movement Register) ..?
फलटण: सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) हा तालुक्यातील महत्त्वाच्या विकासकामांची जबाबदारी सांभाळणारा विभाग आहे. मात्र, फलटण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार सध्या पूर्णपणे 'भोंगळ' झाला असून, येथील अधिकारी कार्यालयातून नेहमीच गायब असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कामासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना अधिकारी भेटत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात असून, लवकरच सातारा येथील मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा लवकरच देणार असल्याचे काही नागरिक बोलत आहे.
फलटण बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ते कधी 'साईड व्हिजिट' (काम पाहणी) असल्याचे सांगतात, तर कधी 'आमच्याकडे अतिरिक्त चार्ज आहे' असे कारण पुढे करून गायब असतात. जेव्हा एखादा नागरिक 'हालचाल नोंद वही' (Movement Register) पाहण्याची मागणी करतो, तेव्हा त्यांना "वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटा" असे सांगून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. तर काही बोलत आहेत आमच्या कार्यालयाकडे नाहीत
कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे अधिकाऱ्यांबाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही. उलट, "साहेब आज इथे नाहीत, उद्या तिथे असतील" अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. यामुळे सामान्य जनतेने आपल्या तक्रारी घेऊन नेमके कोणाकडे जायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विभागाकडे पुरेसे अधिकारी नसल्याने एकाच अधिकाऱ्याकडे अनेक ठिकाणचा कार्यभार (चार्ज) देण्यात आला आहे.
'चार्ज'चे कारण सांगून अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नाहीत.
हालचाल नोंद वही दाखवण्यास टाळाटाळ केली जाते.
वरिष्ठ अधिकारी या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने हा 'भुलवा-भुलावी'चा खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.
"सामान्य नागरिक कामासाठी लांबून येतात, मात्र अधिकारी कधीच जागेवर नसतात. विचारले तर चार्ज असल्याचे कारण सांगितले जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन हा लपंडाव थांबवावा, अन्यथा सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर जनआंदोलन छेडले जाईल. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात येणार आहे.
आता या प्रकरणावर वरिष्ठ प्रशासन कोणती कारवाई करते आणि फलटणच्या जनतेला दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाग 1
Comments
Post a Comment