अत्याचारग्रस्त कुटुंबीयांचे पुनर्वसन केल्याबद्दल वैभव गिते यांचा कोळेगाव येथे सन्मान

माळशिरस (प्रतिनिधी):
महाराष्ट्रभरातील जातीय अत्याचारांमधील पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि ८८९ हत्या प्रकरणांत शासकीय नोकरी मिळवून पुनर्वसन घडवून आणल्याबद्दल, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे (NDMJ) राज्य सचिव वैभव रत्नप्रभा तानाजी गिते यांचा मौजे कोळेगाव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे विशेष सन्मान करण्यात आला.

विश्वरल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून कोळेगाव जयंती समितीच्या वतीने गिते यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
वैभव गिते यांनी राज्यातील बौद्ध, मातंग, चर्मकार यांसह संपूर्ण दलित व आदिवासी समाजातील अत्याचारग्रस्त ८८९ कुटुंबांतील वारसांना शासकीय नोकरी लावून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक निराधार कुटुंबांना सन्मानाने जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेऊन जयंती समितीने त्यांचा जाहीर सत्कार केला.

या सत्काराला उत्तर देताना वैभव गिते यांनी कोळेगाव जयंती समितीचे आभार मानले. ते म्हणाले की, "हा सन्मान केवळ माझा नसून संविधानाच्या वाटेवर चालून पीडितांना न्याय मिळवून देणाऱ्या चळवळीचा आहे. कोळेगावच्या जनतेने दिलेले हे प्रेम अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारे आहे."

या सोहळ्याला परिसरातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?