पत्रकार आप्पासाहेब तांबे यांचा सन्मान
महाराष्ट्र पोलीस टाईम्स व साप्ताहिक भगवा प्रांतचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
फलटण प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल
महाराष्ट्र पोलीस टाईम्स व साप्ताहिक भगवा प्रांत यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात प्रशासकीय, राजकीय, शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.
याच प्रसंगी फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब तांबे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या तांबे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविताना उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाला सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, तसेच विविध पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये राहुल देशपांडे, सायकर साहेब, रविंद्रनाथ भंडारे, गजानन निरपगर, संजय जगताप, विनोद घुगे, महादेव राऊत, भाग्यश्री जाधव, सुरज मुलाणी, निरज उबाळे, कुंदन गावडे, दत्तात्रय बोरीगिड्डे, प्रशांत चौगुले, सुधीर किडकर, सागर कत्ते, भारत मनसावाले, बाजीराव पोवार, टी. शिवाय मुजावर, रोहित उद्योग, विकास दिंडोरे, विशाल वायकर, शिवाजी राऊत, महेश घोडके आदींची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्य संपादक उमेश काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.
Comments
Post a Comment