सार्वजनिक नळ कनेक्शन कारवाई तत्काळ थांबवा, प्रथम प्राणी, पक्षी, यांची पाण्याची , पाणवठ्याची सोय करा, अन्यथा त्रीव स्वरूपाचे आंदोलन ,भीम आर्मी संघटनेचा ईशारा

फलटण : फलटण नगर परिषदे कडून अनधिकृत नळ कनेक्शन व सार्वजनिक नळ कनेक्शन बंद ची कारवाई फलटण शहरात चालु असुन या कारवाई मध्ये सार्वजनिक नळ कनेक्शन बंद केल्या मुळे फलटण शहरातील प्राणी, पक्षी, व इतर जीव यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम झाला असून शहरातील नागरिक असो किंवा पक्षी, प्राणी, असो यांची मुलभुत गरज पाणी असुन ते प्रमुख्याने सार्वजनिक नळ व पाणवठ्यावर उपलब्ध होते . परंतु फलटण नगर परिषदेने घेतलेला सार्वजनिक नळ कनेक्शन बंद मुळे शहरातील अनेक पक्षी, प्राणी पाण्या वाचून तळमळत प्राण सोडत असल्याचे निदर्शनास आले असुन . आपण हि कारवाई तोरीत थांबवावी व वन्य जीव संरक्षण कायदा 1972 चे तंतोतंत पालन करावे व अधी पक्षी, प्राणी, तात्पुरते निवासी यांची पाण्याची, पाणवठ्याची सोय करावी . मग हा निर्णय घ्यावा. अशी भीम आर्मी संघटनेने मागणी केली असून जेने करून पाण्या वाचून कोणताही सजीवाचा जीव जाणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा भीम आर्मी संघटना त्रिव स्वरूपाचे आंदोलन करेल असे संघटने कडून सांगण्यात आले .
अजित संभाजी मोरे, , सुनील पवार, तुषार जाधव, तेजस भोसले

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?