फलटणच्या मा. सभापती मंगलताई मोरे यांना 'आदर्श माता संविधानरत्न' पुरस्कार जाहीर

फलटण (प्रतिनिधी): जय माने 

फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. मंगलताई बापूराव मोरे यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल आणि कौटुंबिक संस्कारांची शिदोरी जपल्याबद्दल आदर्श माता संविधानरत्न पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. साप्ताहिक 'सातारा सम्राट'च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त या विशेष पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, लवकरच एका दिमाखदार सोहळ्यात दिग्गज मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सौ. मंगलताई बापूराव मोरे यांनी सभापती पदाच्या कार्यकाळात तालुक्यात विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. मात्र, केवळ राजकीय पदच नव्हे, तर एक आदर्श माता म्हणून त्यांनी आपल्या समाजावर कुटुंबावर केलेले संस्कार आणि समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी विचारात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मोरे कुटुंबाचे सामाजिक क्षेत्रातील योगदान या निवडीमागे महत्त्वाचा दुवा ठरले आहे.

 अन्यायाविरुद्ध लढणारे नेतृत्व 
मंगलताईंचे मोरे यांचे  पती बापूराव मोरे हे सांगवीसह संपूर्ण फलटण तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर 'हुकमी एक्का' सर्वसामान्य लोकांचे नी गरिबांचे किंग मेकर म्हणून  फलटण तालुक्यात ओळखले जातात. गोरगरिबांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात सर्वात प्रथम धावून जाणारे आणि सामान्यांना न्याय मिळवून देणारे खंबीर नेतृत्व म्हणून त्यांची मोठी ख्याती आहे. संपूर्ण मोरे कुटुंबच समाजसेवेसाठी सदैव तत्पर असल्याने या पुरस्काराचे सर्वत्र स्वागत होत आहे.

मंगल ताई मोरे यांना सातारा सम्राट तिसऱ्या वर्धापन  दिनानिमित्त वृत्तपत्राच्या माध्यमातून आदर्श माता संविधानरत्न' पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तालुक्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?