फलटण सार्वजनिक बांधकाम विभागाचे 'भोईटे क्लार्क' रडारवर; सखोल चौकशीची मागणी ... जय माने
प्रशासकीय वर्तुळात खळबळ; तक्रार दिल्यानंतरच हालचालींना वेग होणार ?
फलटण: विशेष प्रतिनिधी
फलटण येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) लिपिक भोईटे यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्यासाठी NDMG संघटनेच्या वतीने लवकरच मागणी करणार आहे .
विभागातील काही संशयास्पद व्यवहार आणि प्रशासकीय त्रुटींमुळे भोईटे क्लार्क सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, त्यांच्या चौकशीसाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू करतील काय अशा चर्चा सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या महत्त्वाच्या खात्यात कार्यरत असताना, कामकाजात पारदर्शकता नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येत आहे. अनेक प्रलंबित फाईल्स, निविदा प्रक्रियेतील कथित हस्तक्षेप किंवा सर्वसामान्यांच्या कामात होणारी दिरंगाई यांपैकी कोणत्या कारणांमुळे ही चौकशी लावणार या कडे लक्ष लागले आहे.
भोईटे याबाबत सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (NDMJ) चे फलटण तालुकाध्यक्ष **जय भैय्या माने** यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा लवकरच करणार आहे. "शासकीय कार्यालयात जनतेची कामे वेळेत आणि प्रामाणिकपणे होणे अपेक्षित आहे. जर एखादा कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. भोईटे क्लार्क यांच्या कामाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर आले पाहिजे," अशी भूमिका माने यांनी मांडली आहे.
सदर कर्मचाऱ्याच्या विरोधात प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित विभागाचे अधीक्षक अभियंता व नूतन कार्यकारी अभियंता कोणती पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर चौकशीत दोष सिद्ध झाले, तर त्यांच्यावर निलंबनाची किंवा कडक शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागातील आणखी काही 'काळेबेरे' बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्या मुळेच येत्या काही दिवसात भोईटे यांच्यावर कारवाई होण्याच्या मागणी साठी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे अशी माहिती जय माने नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस संघटनेचे फलटण तालुकाध्यक्ष यांनी दिली आहे
भाग 1
Comments
Post a Comment