मौजे बीबी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; आयु. सोमीनाथ घोरपडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
फलटण (प्रतिनिधी) : विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मौजे बीबी येथे सिद्धार्थ तरुण मंडळ, भीमनगर बिबी यांच्या वतीने भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांचे “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या देशाच्या जडणघडणीमध्ये योगदान” या विषयावर झालेले प्रभावी व्याख्यान होय. या व्याख्यानासाठी ग्रामस्थ, बौद्ध उपासक-उपासिका तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आपल्या व्याख्यानात सोमीनाथ घोरपडे यांनी बाबासाहेबांच्या बहुआयामी कार्याचा सखोल आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “बाबासाहेबांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण देशाच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची जाण ठेवून कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे.” औद्योगिक व आर्थिक धोरणांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, सार्वजनिक क्षेत्राच्या विकासासाठी बाबासाहेबांनी महत्त्वपूर्ण दिशा दिली. Rese...