डॉ. बाबासाहेब आंबेडकर सप्ताह' उत्साहात साजरा करा; नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचा इशाराप्रशासकीय दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा
प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ३० मार्च २०२६ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर सप्ताह' अत्यंत प्रभावीपणे साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सप्ताहाच्या अंमलबजावणीत कोणतीही कसर राहिल्यास संबंधित कार्यालयीन प्रमुखांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी दिला आहे.
८ एप्रिलला पत्रकार परिषदेचे आयोजन
शासकीय नियमानुसार, हा सप्ताह ८ जानेवारी ते १४ एप्रिल या कालावधीत विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. सप्ताहाची अधिकृत सुरुवात म्हणून ८ एप्रिल रोजी सर्व कार्यालयीन प्रमुखांनी आपल्या स्तरावर पत्रकार परिषदेचे आयोजन करणे बंधनकारक आहे. या परिषदेत सप्ताहादरम्यान राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची सविस्तर रूपरेषा पत्रकारांसमोर मांडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्व कार्यालयीन प्रमुखांनी आपल्या स्तरावर या शासन निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ सूचना द्याव्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हा सप्ताह अत्यंत महत्त्वाचा असून, यामध्ये कोणतीही प्रशासकीय दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.
"शासन निर्णयानुसार कार्यक्रमांचे आयोजन करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. जर कार्यक्रमांच्या आयोजनात विलंब झाला किंवा टाळाटाळ करण्यात आली, तर संबंधित कार्यालय प्रमुखाच्या कार्यालयासमोर 'नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस'च्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल."
— वैभव तानाजी गिते (राज्य सचिव, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस)
Comments
Post a Comment