कर्तृत्ववान महिला व आदर्श मातांचा नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते गौरव
अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाचा स्तुत्य उपक्रम; समाज बांधवांची मोठी उपस्थिती
सातारा:
घडशी समाज सेवा संस्था संचलित अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेणाऱ्या युवती आणि कर्तृत्ववान आदर्श मातांचा सन्मान सोहळा सातारा येथे उत्साहात पार पडला. आज दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती घराण्याचे वंशज आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी त्यांचे शुभहस्ते हा गौरव सोहळा संपन्न झाला.
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खालील महिला व युवतींना या प्रसंगी सन्मानित करण्यात आले:
सौ. लताबाई अशोक धुमाळ, सौ. आनंदीबाई संजय साळुंखे, सौ. वंदनाताई अशोक साळुंखे, सौ. पुजा श्रीकुमार साळुंखे, सौ. दिपाली विठ्ठल पवार, श्रीमती रूपाली राजेंद्र धुमाळ, सौ. नलश्री विजय धुमाळ, सौ. स्मिता जितेंद्र पवार, सौ. सायली अमोल काळे, कु. वैष्णवी लालासो साळुंखे आणि श्रीमती मालन वाडेकर.
प्रमुख उपस्थिती आणि सत्कार
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. दिलीप पवार, राज्य अध्यक्ष श्री. अनिल शंकरराव पवार आणि राज्य खजिनदार श्री. धोंडिराम साळुंखे यांच्या हस्ते नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर राज्य सहसचिव श्री. अशोक काळे, राज्य संचालिका सौ. शलाका मोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. जगन्नाथ पवार, मधुकर धुमाळ, अनिल वनारे, उद्धव पवार, जिल्हा उपाध्यक्ष शंकर पवार, जिल्हा सचिव मनोज पवार, जिल्हा खजिनदार राजेंद्र साळुंखे आणि फलटण तालुका अध्यक्ष कु. ओंकार पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
विशेष योगदान आणि सांगता
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. जगन्नाथ कृष्णा पवार, आणि श्री. लालासो साळुंखे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. याच कार्यक्रमात जिल्हाध्यक्षांना नियुक्ती पत्रेही प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल शंकरराव पवार यांनी केले. यावेळी सचिन पवार, लाला साळुंखे, संतोष पवार, श्रीकुमार साळुंखे, विजय धुमाळ, अमोल काळे यांसह मोठ्या संख्येने घडशी समाज बांधव उपस्थित होते. समाजातील महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव झाल्याने सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment