विस्तार अधिकारी बी.बी. भोसले यांचा अहवाल रद्द करून त्यांची चौकशी व्हावी.
दालवडीत 'संविधान अमृत महोत्सव' केवळ कागदावरच; दोषींना पाठीशी घालणाऱ्या चौकशी विस्तार अधिकाऱ्यांची यांची चौकशी करा
फलटण प्रतिनिधी:
शासनाच्या आदेशानुसार राबवण्यात येणाऱ्या 'संविधान अमृत महोत्सव' अंमलबजावणीत दालवडी (ता. फलटण) ग्रामपंचायतीने गंभीर अनियमितता केल्याचा आरोप 'नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस' (NDMJ) संघटनेने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणा केल्याचा दावा करत, येत्या सात दिवसांत निष्पक्ष चौकशी न झाल्यास सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात येणार असल्याचे बोलले आहे.
शासकीय निर्णयानुसार २६ नोव्हेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या काळात सर्व ग्रामपंचायतींमध्ये संविधान अमृत महोत्सव साजरा करणे बंधनकारक होते. मात्र, दालवडी ग्रामपंचायतीने हा उत्सव प्रत्यक्षात साजरा न करता केवळ कागदोपत्री घोडे नाचवल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या विरोधात १० मार्च रोजी फलटण पंचायत समितीसमोर उपोषण करण्यात आले होते.
प्रशासनाने या तक्रारीनंतर २५ पानांचा अहवाल सादर केला. मात्र, या अहवालातील फोटो प्रत्यक्ष कार्यक्रमाचे नसून ते 'नेट कॅफे'वरून तयार केलेले बनावट फोटो असल्याचा संशय संघटनेने व्यक्त केला आहे. या फोटोंची सायबर/तांत्रिक तज्ञांमार्फत पडताळणी करण्याची मागणी करण्यात यावी.
विस्तार अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह आहे ?
या प्रकरणाची चौकशी करणारे विस्तार अधिकारी बी.बी. भोसले यांनी तक्रारदार किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आपली बाजू मांडण्याची संधीच दिली नाही. केवळ प्रशासनाला सोयीच्या व्यक्तींचे जबाब नोंदवून त्यांनी तथ्यहीन अहवाल सादर केला, असा खळबळजनक आरोप संघटनेने केला आहे. ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
विस्तार अधिकारी बी.बी. भोसले यांचा अहवाल रद्द करून त्यांची चौकशी व्हावी.
सादर केलेल्या फोटोंची तांत्रिक पडताळणी व्हावी.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
निवेदनावर NDMJ चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते, प्रसिद्धी प्रमुख गोविंद मोरे आणि फलटण तालुकाध्यक्ष जय माने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा संघटना घेणार असल्याचे बोलले जात आहे.
Comments
Post a Comment