दोन चाकी वाहनांच्या दुरुस्तीतील फलटण मधील 'किंग'; महेश जमदाडे यांचा आज वाढदिवस...
मैत्रीच्या दुनियेतील 'राजा माणूस' आणि टू-व्हीलर मेकॅनिक क्षेत्रात आपल्या कौशल्याने वेगळी ओळख निर्माण केलेले महेश जमदाडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पंचक्रोशीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
गॅरेज व्यवसायात 'मास्तरकी'
महेश जमदाडे यांनी आपल्या गॅरेज व्यवसायाच्या माध्यमातून अल्पावधीतच मोठे नाव कमावले आहे. कोणत्याही कंपनीची दुचाकी असो, त्यातील तांत्रिक बिघाड ओळखण्यात आणि तो चुटकीसरशी दुरुस्त करण्यात त्यांचा हातखंडा आहे. केवळ व्यवसाय न ठेवता, आपल्या ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासल्यामुळे आज पंचक्रोशीतील नावाजलेले मेकॅनिक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
मैत्रीचा 'राजा माणूस'
व्यावसायिक कौशल्यासोबतच महेश जमदाडे हे त्यांच्या मनमिळावू स्वभावासाठी ओळखले जातात. 'दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस' अशी त्यांची त्यांच्या मित्रपरिवारात ओळख आहे. संकटाच्या वेळी मित्रांच्या मदतीला धावून जाणे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणे हा त्यांचा स्वभाव गुण अनेकांना भावतो.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे स्नेही, मित्र परिवार, ग्राहक आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
आज तुमचा वाढदिवस निमित्ताने, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! तुमच्या आयुष्यात नेहमी आनंद, प्रेम आणि सुख असो.तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो आणि तुमचं जीवन हसत आणि आनंदी राहो.
शाहू फुले आंबेडकर चळवळीचे विचार जनमानसात पोहचवण्याचे कार्य सतत घडत जावे
कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रासारख तुमचं यश, आणि तुमचा लौकिक नित्य वाढत जावो, सौख्य आणि समाधानाचा वर्षाव तुम्हावर नित्य होत राहो, आणि तुमची प्रतिष्ठा सदैव वृद्धिंगत होत जावो, तुमच्या चंद्र मुखावर सतत हास्य राहो, अन हा दिवस पुन्हा पुन्हा येवो.
आपणांस आपल्या जन्म दिवसासाठी हार्दिक शुभेच्छा
आपणास वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
*संपादक गोविंद मोरे*
*सातारा सम्राट*
. 🌹🙏🌹.
Comments
Post a Comment