शहीद जवान अजित बागाव यांच्या अंत्यविधीप्रसंगी अनुपस्थित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करा
शहीद जवान अजित बागाव यांच्या अंत्यविधीप्रसंगी अनुपस्थित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी,या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सातारा यांना देण्यात आले.प्रांताधिकारी,नगरपरिषद मुख्याधिकारी व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून शासकीय पत्रव्यवहार,उपस्थितीची नोंद तसेच उपलब्ध ड्रोन/चित्रीकरणाची तपासणी करावी,अशी मागणी करण्यात आली.शहीद जवानाच्या सन्मानाच्या विषयात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही,अशी भूमिका DPI युवक अध्यक्ष मंगेश प्र.आवळे यांनी व्यक्त केली.यावेळी ऋषिकेश गायकवाड (रावण),निलेश घोलप व आदित्य पाटोळे उपस्थित होते.