22 सप्टेंबरचा जाचक GR रद्द करा, अन्यथा 1 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन
रोजगार सहाय्यकांचा तहसीलदारांना सह पंचायत समिती गटविकास अधिकारी साहेब यांच्या कडे निवेदन देवून इशारा
*फलटण (जि. सातारा) :-* महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (मनरेगा) आता विकसित भारत जी राम जी योजना या नावाने ओळखली जाते. या योजनेचे काम प्रत्येक गाव पातळीवर प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात रोजगार सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या 24 महिन्यांपासून मानधन न मिळताही या रोजगार सहाय्यकांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे.
परंतु शासनाने 22 सप्टेंबर 2026 रोजी तमाम रोजगार सहाय्यकांवर अन्याय करणारा अत्यंत जाचक असा शासन निर्णय काढला आहे. या विरोधात पूर्ण महाराष्ट्रातील रोजगार सहाय्यकांच्या मनात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर आज दि. 30/09/2026 रोजी *महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक विकास युनियन, ता. फलटण, जि. सातारा (रजि. नं. पी. एन. 5190)* च्या वतीने मा. तहसीलदार सो, फलटण यांना निवेदन देण्यात आले.
*युनियनच्या प्रमुख मागण्या :-*
1) 22 सप्टेंबर 2026 रोजीचा जाचक शासन निर्णय त्वरित रद्द करणेबाबत.
2) 3 ऑक्टोबर 2024 चा शासन निर्णय त्वरित लागू करून, त्यानुसार 3 ऑक्टोबर 2024 पासून ते आजअखेरचे सर्व थकीत मासिक मानधन रोजगार सहाय्यकांच्या वैयक्तिक खात्यात जमा करणेबाबत.
3) रोजगार सहाय्यकांना सुरक्षा कवच प्रदान करणेबाबत.
4) वरील मागण्या मान्य न झाल्यास - *1 ऑक्टोबर 2026 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करणेबाबत.*
निवेदनात म्हटले आहे की, "हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी झटणाऱ्या रोजगार सहाय्यकालाच मात्र शासनाने 24 महिने होऊन सुद्धा कोणतेही मासिक वेतन किंवा मानधन दिले नाही. तसेच कोणत्याच सोयी सुविधा सुरक्षा कवच म्हणून दिल्या जात नाहीत. यामुळे रोजगार निर्मितीसाठी मोलाची साथ देणाऱ्या रोजगार सहाय्यकावरच उपासमारीची वेळ येऊन मुलाबाळांच्या शैक्षणिक व प्रापंचिक खर्चाच्या अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे."
"तरी 22 सप्टेंबर 2026 चा GR रद्द करून, 3 ऑक्टोबर 2024 च्या GR प्रमाणे ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2026 पर्यंतचे पूर्ण मानधन वैयक्तिक खात्यावर जमा करावे, ही आमची कळकळीची विनंती आहे. जोपर्यंत मानधन जमा होत नाही, तोपर्यंत आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करत आहोत," असा इशारा युनियनने दिला आहे.
या वेळी *प्रसिद्ध प्रमुख मा.प्रेम मोरे,*
*फलटण तालुका अध्यक्ष *श्री. संतोष सुळ (मो. 7340596700)*, तालुका उपाध्यक्ष श्री. कालिदास गोडसे, तालुका सचिव श्री. अमोल गावडे, कोषाध्यक्ष श्री. गौतम भोसले, कार्याध्यक्ष श्री. मंगेश शिंदे, सहसचिव श्री. सुधीर यादव, सहकोषाध्यक्ष श्री. राजेंद्र गोफणे, महिला संघटक सौ. रोहिणी कदम, सल्लागार श्री. बापूराव घुले, गट प्रमुख श्री. शरद जाधव, प्रवक्ते श्री. सागर पिसाळ, सोशल मीडिया प्रमुख श्री. प्रमोद खरात. दिनेश कांबळे आदी रोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---
* फलटण तहसीलदार कार्यालयात निवेदन देताना महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक विकास युनियनचे पदाधिकारी.
Comments
Post a Comment