एस.टी.सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य!
फलटण-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी सवलतीच्या प्रवासासाठी १ आक्टोंबर पासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक ,ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना सवलतीच्या दारात प्रवास करण्यासाठी या कार्डचा वापर करावा लागणार आहे त्यामुळे पात्र प्रवाशांनी वेळेत एनसी एमसी कार्ड ची नोंदणी करून घ्यावी असे आवाहन फलटण आगार व्यवस्थापनाने केले आहे.
शासनाच्या निर्णयानुसार विविध प्रवर्गातील प्रवाशांना एसटी कडून सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते ही सवलत अधिक पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी एमसीएमसी कार्ड प्रणाली लागू करण्यात आली आहे. यापुढे सवलतीचे तिकीट देताना कार्डचा वापर केला जाणार आहे. राज्यातील एसटी आगार व बस स्थानकावर कार्ड नोंदणी आणि वितरण प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वीच कार्यरत असलेल्या एनसीएमसी कार्डधारकांना त्याच कार्डाचा वापर करून प्रवास करता येईल. नव्याने नोंदणी करणाऱ्या प्रवाशांना क्यूआर कोड असलेली पावती देण्यात येणार असून त्या आधारे 30 दिवसापर्यंत सवलतीचा लाभ घेता येणार आहे. या कालावधीत प्रवाशांनी एमसीएमसी कार्ड कार्यरत करून त्यामध्ये आवश्यक रक्कम-टॉप करणे आवश्यक आहे.
कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी भीम ॲप तसेच कार्ड वरील क्यूआर कोड स्कॅन करून डिजिटल पद्धतीने टॉप-अप करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. एक आक्टोंबर पासून सवलतीच्या तिकिटासाठी एनसीएमसी कार्ड आवश्यक असलेने जेष्ठ नागरिक व महिला प्रवाशांनी ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आगार किंवा बस स्थानकात जाऊन कार्ड नोंदणी पूर्ण करावी. असे आवाहन फलटण आगार प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment