गवळीनगर येथे 'कोण बनेल करोडपती' स्पर्धा संपन्न; मुथुट फिनकॉर्पतर्फे विविध योजनांची माहिती
फलटण:येथील गवळीनगर येथे गवळी बाबा गणेशोत्सव मंडळ, गवळीनगर आणि मुख्य प्रायोजक मुथुट फिनकॉर्प, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली 'कोण बनेल करोडपती?' ही विशेष ज्ञानवर्धक स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. या चुरशीच्या स्पर्धेत वेदांश विपुल गावडे याने प्रथम क्रमांक पटकावला.या कार्यक्रमाप्रसंगी मुथुट फिनकॉर्पचे योगेश गावडे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना मुथुट फिनकॉर्पच्या विविध उत्पादनांची आणि योजनांची सविस्तर माहिती गावकऱ्यांना दिली. सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या फायदेशीर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अतिशय अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे:प्रथम क्रमांक: *वेदांश विपुल गावडे* (१ स्टडी टेबल, रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी)द्वितीय क्रमांक: *हर्षदा कल्याण गावडे* (१ स्टडी टेबल आणि आकर्षक ट्रॉफी)तृतीय क्रमांक: *संस्कृती भाऊसो माने* (१ स्टडी टेबल आणि आकर्षक ट्रॉफी)
मुख्य विजेत्यांसोबतच या स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर सर्व स्पर्धकांचे कौतुक करत त्यांना प्रशस्ती पत्रक आणि शाळोपयोगी वस्तूंचा एक पाऊच देऊन सन्मानित करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गवळी बाबा गणेशोत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेत मोलाचे सहकार्य केले. मंडळाचे शिस्तबद्ध नियोजन आणि मुथुट फिनकॉर्पचे प्रायोजकत्व यामुळे हा सोहळा गवळीनगरमधील नागरिकांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरला.
Comments
Post a Comment