अजय देशपांडे यांना 'उत्कृष्ट अभियंता पुरस्कार' मिळाल्याबद्दल भारतीय संविधान भेट देऊन केला विशेष सन्मान

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत (PWD) सन २०२५-२६ या वर्षाचा 'उत्कृष्ट अभियंता पुरस्कार' उपविभागीय अभियंता श्री. अजय शरदराव देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. रस्ते, इमारती व पुलांची कामे अत्यंत दर्जात्मक, गुणवत्तेने आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण केल्याबद्दल शासनाकडून त्यांना या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.  
या उल्लेखनीय यशाबद्दल 'साप्ताहिक सातारा सम्राट' चे संपादक गोविंद मोरे आणि 'अजिंक्य सह्याद्री' चे संपादक सम्राट गायकवाड, सुप्रसिद्ध डाळिंब शेतकरी व उद्योजक दादासाहेब करणे कर्णे यांनी श्री. अजय देशपांडे यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांना 'भारतीय संविधान' ची प्रत भेट देऊन त्यांचा भावुक व औपचारिक सत्कार करण्यात आला.
प्रशासकीय सेवेत सचोटीने व गुणवत्तेने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा असा सन्मान समाजकार्याला आणि प्रशासनाला अधिक गती देणारा ठरतो, अशा भावना या वेळी पत्रकारांनी व्यक्त केल्या.
या सत्काराबद्दल उपविभागीय अभियंता श्री. अजय देशपांडे यांनी सर्व पत्रकारांचे व शुभेच्छा देणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा