साप्ताहिक सातारा सम्राटच्या बातमीची धडक दखल! साखरवाडी-जिंती-फलटण रस्त्याचे काम अखेर सुरू
फलटण (विशेष प्रतिनिधी):
साखरवाडी-जिंती-फलटण रस्त्याची झालेली अत्यंत दयनीय अवस्था, उखडलेले डांबर आणि खड्ड्यांचे साम्राज्य यांमुळे रुग्ण, शेतकरी व विद्यार्थ्यांचा जीव कसा धोक्यात आला आहे, याकडे 'साप्ताहिक सातारा सम्राट'ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या प्रसिद्ध केलेल्या सडेतोड बातमीची सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तातडीने गंभीर दखल घेतली आहे.
बातमी प्रसिद्ध होताच संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी हलले असून, रस्त्याच्या दुरुस्ती व खडीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.
'सातारा सम्राट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे आणि नागरिकांच्या आंदोलनाच्या इशार्यानंतर PWD विभागाने तातडीने यंत्रसामग्री आणि कर्मचारी घटनास्थळी पाठवून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले.
खड्डे बुजवून रस्त्याचे सपाटीकरण व डांबरीकरणाचे प्राथमिक काम सुरू झाल्याने उपचारासाठी जाणारे रुग्ण, शेतीमाल वाहतूक करणारे शेतकरी आणि रोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या गंभीर समस्येला वाचा फोडून प्रशासनाला जागे केल्याबद्दल साखरवाडी, जिंती आणि परिसरातील ग्रामस्थांनी 'साप्ताहिक सातारा सम्राट' आणि मुख्य संपादकांचे विशेष आभार मानले आहेत.
"बातमी प्रसिद्ध होताच काम सुरू झाले असले, तरी हे काम केवळ थातुरमातूर न होता अत्यंत दर्जदार आणि गुणवत्तेचे व्हावे. रस्ता पूर्ण होईपर्यंत 'सातारा सम्राट' या कामावर बारकाईने लक्ष ठेवून राहील," असा पुनरुच्चार कार्यकारी संपादकांनी केला आहे.
Comments
Post a Comment