मठाचीवाडी विद्यालयातील कबड्डी स्पर्धेत मुलींचा संघ जिल्ह्यात प्रथम
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील कबड्डी स्पर्धेत मठाचीवाडी विद्यालय मठाचीवाडी या विद्यालयातील मुलींच्या संघाने सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे
शालेय शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशन येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत एकूण सातारा जिल्ह्यातील आठ संघाने सहभाग घेतला होता अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत अंतिम सामना फलटण विरुद्ध माण तालुका अशी रोमांचक लढत रंगली होती अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघाला पाच आक्रमण करण्याची संधी देण्यात आली होती यामध्ये मठाचीवाडी विद्यालय मठाचीवाडी येथील मुलींनी या संधीचा फायदा उठवत 14 विरुद्ध 4अशी एकतर्फी लढत जिंकली त्यामुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या संघाला प्रशिक्षक म्हणून मठाचीवाडी विद्यालय मुख्याध्यापक लक्ष्मण शेंडगे सर क्रीडा शिक्षक अमिर आतार सर प्राची धनवडे मॅडम सतीश सोनलनकर सर मज्जिद खान मुलानी सर श्री राज भोसले महेश मुळीक बाबू जाधव यांनी मार्गदर्शन केले
या यशाबद्दल श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे सचिव राहुल कणसे प्रशासनाधिकारी शिवलाल गावडे मठाचीवाडी गावच्या सरपंच जयश्रीताई भोसले उपसरपंच काकासाहेब कदम केके प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय भैया कदम जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा जगताप पंचायत समिती सदस्य वनिता आढाव निंबळक केंद्रप्रमुख चंद्रकांत दराडे आदर्श शिक्षक संजय भोसले मंगेश भैय्या भांडवलकर सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय भोसले कै. संजय गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदराव जाधव सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक भोसले यांच्या सह ग्रामस्थांनी खेळाडूंची मोठी मिरवणूक काढून त्यांचे अभिनंदन केले
Comments
Post a Comment