फलटण येथे जैन सोशल ग्रुपतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन


फलटण:
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जैन सोशल ग्रुप, फलटण यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास MaRC व्यसनमुक्ती कमिटीचे कन्वेनर डॉ. सूर्यकांत दोशी, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, सचिव सौ. निना कोठारी, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी आणि संचालिका सौ. मनीषा घडिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला ग्रुपचे सदस्य राहुल गांधी, विकास कोठारी, दिनेश उपाध्ये आणि श्रेयांश जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा