केमिकल मिश्रित विषारी दारूमुळे राजाळेत तरुणांचा जातोय बळी..?कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा बेमुदत उपोषणाचा इशारा!
( प्रशासकीय अनास्थेमुळे राजाळे गावात बेकायदा धंद्यांचे पेव ) ग्रामपंचायतीचा फलटण पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला थेट इशारा फलटण : फलटण तालुक्यातील जनाई देवी तीर्थक्षेत्र असलेल्या राजाळे गावात केमिकल मिश्रित हातभट्टीची बेकायदा दारू विक्री, मटका, गुटखा, जुगार आणि गांजा यांसारख्या अवैध धंद्यांनी भयानक रूप धारण केले आहे. या विषारी दारूमुळे गावातील तरुण पिढी पूर्णपणे व्यसनाधीन झाली असून, दर पंधरा दिवसाला कोणत्या ना कोणत्या तरुणाचा या विषारी दारूमुळे किंवा दारू पिऊन प्राशन केल्यामुळे मृत्यू होण्याचे चित्र होणार की काय असे धक्कादायक नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. या गंभीर परिस्थितीबाबत राजाळे ग्रामपंचायतीने पोलीस प्रशासन आणि दारूबंदी विभागाकडे तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. जुन्या तक्रारींवर ठोस कारवाई शून्य! राजाळे ग्रामपंचायतीने आणि ग्रामस्थांनी यापूर्वी २०२१ पासून अनेकदा लेखी तक्रारी दिल्या आहेत. यामध्ये गावठी दारू विक्रेत्यांची नावे देखील पोलीस प्रशासनाला पुरवण्यात आली होती. मात्र, पोलीस अथवा दारूबंदी (राज्य उत्पादन शुल्क) विभागाने क...