भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका,सोनगाव वर्धापनदिनी मोलाची भेट
सोनगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचा द्वितीय वर्धापनदिन नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या विशेष औचित्याचा सन्मान राखत *डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्षीय समिती 2025, फलटण* यांच्या वतीने MPSC पुस्तकांचा संच भेट म्हणून देण्यात आला.
ज्ञानदानाच्या या उपक्रमामुळे अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी नव्या संधींचे दार खुले झाले आहे. ही पुस्तके अभ्यासिकेचे *अध्यक्ष आयु.राजेश निकाळजे* यांनी नम्रतापूर्वक स्वीकारली.
त्यावेळी *प्रमुख उपस्थिती* *आमदार सचिन कांबळे पाटील नगराध्यक्ष समशेरदादा नाईक निंबाळकर, आप्पा मांढरे,सचिन अहिवळे सर, सुपर्णा ताई अहिवळे, मीनाताई काकडे, सनी मोरे,सनी अहिवळे,किरण राऊत, रोहीत नागटिळे,हरीश काकडे,विकी बोके,मुकेश रणपिसे व इतर नगरसेवक, समाजसेवक* उपस्थित होते
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्षीय समिती 2025, फलटणचे *गणेश अहिवळे, अजय काकडे, गोविंद काकडे, सुरज काकडे, सिद्धार्थ अहिवळे,कपिल काकडे* आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे “वाचनातूनच परिवर्तन” हा संदेश अधिक दृढ झाला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
Comments
Post a Comment