Posts

जनमानसातील नेतृत्व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर अन् पत्रकार राजेंद्र बोंद्रे यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते!

Image
फलटण: राजकारणात नेते आणि पत्रकार यांच्यात अनेकदा कामापुरतेच संबंध पाहायला मिळतात. मात्र, फलटण तालुक्याचे 'विकास रत्न' आणि कार्यक्षम माजी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे व्यक्तिमत्त्व याला अपवाद आहे. नुकत्याच फलटण येथे संपन्न झालेल्या 'संविधान दिंडी' कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वेगळेच कौटुंबिक आणि आपुलकीचे चित्र पाहायला मिळाले. या सोहळ्यात समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि फलटणचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बोंद्रे यांच्यातील कमालीची जवळीक व स्नेह पुन्हा एकदा अधोरेखित झाला. पत्रकार नव्हे, तर 'कार्यकर्ता' मानणारे नेतृत्व समशेरसिंह नाईक निंबाळकर हे फलटणच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यपद्धतीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे, ते पत्रकारांकडे केवळ बातमीदार म्हणून पाहत नाहीत. पत्रकारिता करतानाच समाजाच्या हितासाठी झटणारा एक 'कार्यकर्ता' म्हणून ते पत्रकारांना आदराचे स्थान देतात. पत्रकार राजेंद्र बोंद्रे यांच्याशी असलेले त्यांचे नातेही याच विश्वासावर आणि प्रेमावर आधारलेले आहे. नगरसेवकांपेक्षाही पत्रकारांना अधिक आपुलकी आणि माया अनेकद...

फलटण मुक्कामी वारकऱ्यांना 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटने'कडून बिस्कीट आणि पाणी बॉटल वाटप!

Image
फलटण (प्रतिनिधी): श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आज फलटण येथे आगमन झाले असून, या सोहळ्यातील वारकरी भाविकांच्या (माऊलींच्या) सेवेसाठी 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटनेच्या' वतीने ग्लुकोज बिस्कीट आणि बिस्लेरी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी दरवर्षी अनेक सामाजिक संस्था पुढे येत असतात. याच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत, फलटण मुक्कामी आलेल्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना प्रवासाच्या थकव्यात आणि उन्हाच्या त्रासापासून दिलासा मिळावा, या हेतूने रिक्षा संघटनेच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. यावेळी हजारो वारकऱ्यांना अत्यंत आपुलकीने पाणी आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या मान्यवरांची लाभली उपस्थिती: या सेवाभावी उपक्रमाचे नियोजन आणि वाटप करताना संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने: दिनेश अहिवळे (अध्यक्ष, रिक्षा संघटना) संजयभाऊ मोरे,सनी कदम,दादा अहिवळे,महेंद्र काकडे बाळु मोरे,हरिदास अहिवळे,विशाल अहिवळे,पिंटु अहिवळे, काळु अहिवळ...

फलटण येथे 'बार्टी'च्या संविधान दिंडीचे उत्साहात स्वागत;

Image
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, व पोलिस उपअधीक्षक धान्यकुमार गोडसे यांच्या हस्ते उद्घाटन!  फलटण ...संविधानाचा जागर व उद्देशिकेचे सामूहिक वाचनफलटण:डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने समता दूत प्रकल्पाच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही 'संविधान दिंडी'चे आयोजन करण्यात आले आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करणारी ही संविधान दिंडी आज, १७ जुलै रोजी फलटण शहरात दाखल झाली. फलटणकरांनी या दिंडीचे अत्यंत उत्साहात आणि भक्ती-भावाच्या वातावरणात स्वागत केले.फलटण नगरपरिषदेसमोरील ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संविधान दिंडीचे आगमन झाले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर आणि नागरिकांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (प्रस्तावना) सामूहिक रित्या वाचन करून लोकशाहीच्या मूल्यांचा जागर केला.विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थितीया सोहळ्याला फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह न...

सरडे येथील चव्हाण वस्ती रस्त्याच्या टेंडरमध्ये ग्रामसेवकाचा गोलमाल? ग्रामपंचायतीच्या सदस्यांना डावलून छुप्या पद्धतीने 'टेंडर' काढल्याने संतापाची लाट!

Image
माहिती लपवण्यासाठी नावापुरतीच पेपर प्रसिद्धी; ठेकेदार आणि ग्रामसेवकाची मिलीभगत असल्याचा संशय..? सरडे (वार्ताहर): मौजे सरडे येथील चव्हाण वस्ती येथे रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामावरून सध्या ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामसेवक चांगलेच अडचणीत येतील काय अशा चर्चा सुरू आहेत. काम करण्यास कोणाची अडचण नाही पण मलिदा खाण्यासाठी ग्रामसेवक यांनी छुप्या पद्धतीने पेपर मध्ये नोटीस दिली आहे का असे नागरिक बोलत आहे. गावातील काम करण्यास आमची कोणाची अडचण नाही पण ठेकेदार आणि ग्रामसेवक सह राजकीय जवळीक नेते मिळून काम करत असेल तर नक्की नागरिकांची अडचण असल्याचे काही बोलत आहेत.  या रस्त्याच्या कामाचे टेंडर (निविदा) काढताना स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांना पूर्णपणे अंधारात ठेवून, गावाला कोणतीही कल्पना न देता छुपी टेंडर प्रक्रिया राबवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ग्रामसेवकाच्या या हुकूमशाही कारभाराविरुद्ध आणि गावाला अंधारात ठेवण्याच्या वृत्तीविरुद्ध ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, "ग्रामसेवकांनी गावाला नाचवण्याचे काम करू नये," असा संतप्त इशारा आता दिला जात आहे. चव्...

सरडे ग्रामपंचायत निवडणूक: 'तिसरी आघाडी'चा एल्गार; जुन्या नेत्यांना डच्चू देत तरुणांच्या हाती सत्ता देण्याचा निर्धार!

Image
सरडे ग्रामपंचायत निवडणूक  जुने नेते बाजूला ठेवू, नागरिकांच्या मदतीने नवीन युवा नेता तयार करू नव विचार, नवीन विकासाचे स्वप्न, आमचं ध्येय सत्ता आणि परिवर्तन.....तिसरी आघाडी  सरडे: सरडे ग्रामपंचायत होणाऱ्या निवडणूक बिगुल वाजताच गावच्या राजकीय वातावरणात कमालीची उष्णता निर्माण झाली आहे. आजवर पारंपरिक आघाड्या आणि प्रस्थापित नेत्यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या सरडे गावच्या राजकारणाला आता एक वेगळे आणि क्रांतिकारी वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. गावातील सुजाण नागरिकांच्या पाठबळाने ‘तिसरी आघाडी’ मैदानात उतरली असून, त्यांनी थेट प्रस्थापित आणि जुन्या नेत्यांना बाजूला सारत नव्या दमाच्या युवा नेतृत्वाला संधी देण्याचा नारा दिला आहे.  "नव विचार, नवीन विकासाचे स्वप्न, आमचं ध्येय सत्ता आणि परिवर्तन..." या ध्येयवाक्यासह तिसऱ्या आघाडीने गावात प्रचाराचा धडाका सुरू केला असून, त्यांच्या या भूमिकेला तरुणांसह ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. जुन्या नेत्यांना डच्चू; आता युवकांची पाळी! गेल्या अनेक वर्षांपासून गावातील सत्ता विशिष्ट नेत्यांच्या आणि गटांच्या हातात राहिली आहे. मात्र...

फलटण वकील संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा ग्रंथ भेट देऊन सन्मान; 'ॲड. बापुसाहेब शिलवंत अँड असोसिएट्स'कडून शुभेच्छा

Image
फलटण, प्रतिनिधी : फलटण वकील संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा 'ॲड. बापुसाहेब शिलवंत अँड असोसिएट्स' यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना यशस्वी, लोकाभिमुख आणि न्यायनिष्ठ कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. फलटण वकील संघाचे नवनियुक्त अध्यक्ष ॲड. उमेश कदम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित "जनता" हा ग्रंथ भेट देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच उपाध्यक्ष ॲड. मेघा अहिवळे, सचिव ॲड. अनिरुद्ध सस्ते, सहसचिव ॲड. शारदा दीक्षित, खजिनदार ॲड. शाम अहिवळे, सदस्य ॲड. चैत्राली शिंदे आणि सदस्य ॲड. रोहिणी भंडलकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे "जाती निर्मूलन (Annihilation of Caste)" हे विचारप्रवर्तक पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, न्याय, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा वारसा समाजात अधिक दृढ व्हावा, तसेच वकिली व्यवसायात सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने हे ग्रंथ भेट देण्यात आल्याचे ॲड. बापुसाहेब शिलवंत यांनी...

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यात नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणार; सचिव गोविंद मोरे यांचे आवाहन

Image
सातारा / फलटण: केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू दळवी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे सचिव गोविंद मोरे यांच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे. केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात अतिशय प्रभावीपणे व निष्ठेने कार्यरत आहे. संघटनेने आजवर अनेक लोकोपयोगी प्रश्न मार्गी लावले आहेत. हाच वारसा पुढे चालवत, सर्वच क्षेत्रांमध्ये संघटनेचे काम नवीन जोमाने आणि अधिक व्यापक करण्यासाठी जुन्या व अनुभवी पदाधिकाऱ्यांसह नवीन चेहऱ्यांना सोबत घेऊन लवकरच पुढील कार्यक्रमांचे विशेष नियोजन केले जाणार आहे. इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन: ज्या नागरिकांना किंवा तरुणांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय राहून काम करण्याची आवड आहे, अशा सर्व इच्छुकांनी केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे सचिव गोविंद मोरे यांच्याशी खालील क्रमांकावर संपर्...

नितीन जगताप यांची 'साप्ताहिक सातारा सम्राट'च्या कार्यकारी संपादक पदी निवड

Image
फलटण / साखरवाडी: पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखणीच्या जोरावर अल्पावधीतच अढळ स्थान निर्माण केलेले 'साप्ताहिक सातारा सम्राट'चे साखरवाडी येथील धडाडीचे प्रतिनिधी नितीन जगताप यांची वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादक (Executive Editor) पदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. वृत्तपत्राचे मुख्य संपादक गोविंद अरुण मोरे यांनी नुकतीच ही घोषणा केली. नितीन जगताप यांनी आजवर साखरवाडी परिसरासह फलटण तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय गैरकारभारावर आपल्या रोखठोक वार्तांकनातून प्रकाश टाकला आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रशासना दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने आग्रही भूमिका घेतली आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची, सचोटीची आणि पत्रकारितेतील सातत्याची दखल घेऊन त्यांना ही नवी आणि महत्त्वाची जबाबदारी बहाल करण्यात आली आहे. या निवडीनंतर साप्ताहिक पत्रकारिता वर्तुळातून नितीन जगताप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून यापुढेही लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करत, अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असा विश्वास नवनिय...

सरडे ग्रामपंचायत निवडणूक: वॉर्ड क्रमांक ४ मधून सौ. शीतल निलेश आवटे यांच्या नावाची जोरदार चर्चा; नागरिकांच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरणार!

Image
सरडे (प्रतिनिधी): सरडे गावच्या स्थानिक राजकारणात आणि आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक ४ मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. कित्येक वर्षांनंतर पहिल्यांदाच हा वॉर्ड अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे, या भागातील राजकीय आणि सामाजिक समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या राखीव जागेवरून आता सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी आणि वॉर्डाच्या विकासासाठी सौ. शीतल निलेश आवटे निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा संपूर्ण वॉर्डात सुरू आहे. सौ. शीतल निलेश आवटे यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणींना धावून जाणारे आणि विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्न करणारे कुटुंब म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेने वॉर्डातील नागरिकांमध्ये एक आशेचे किरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून वॉर्ड समस्यांच्या गर्तेत; दुर्लक्षाबद्दल नाराजी वॉर्ड क्रमांक ४ मधील नागरिकांना आजही अनेक मूलभूत आणि पायाभूत सोयी-सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता आणि इतर स्थानिक अडचणींमुळे येथील नागरिक त्रस्त आह...

सरडे गावात तिसरी आघाडी निघणार? तिसऱ्या आघाडीचे सूत्र कोण हाती घेणार..?

Image
सरडे (विशेष प्रतिनिधी): सरडे गावच्या राजकारणात अलीकडे कमालीचे वेगळे राजकीय वारे वाहू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात ‘युवा कार्यकर्त्यांची तिसरी आघाडी’ उभी राहणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगू लागल्याने प्रस्थापित राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. गावातील प्रस्थापित, जुने पुढारी आणि पारंपरिक नेत्यांच्या राजकारणाला सरडे गावची जनता आता पूर्णपणे कंटाळली असल्याचे चित्र सर्वसामान्य नागरिकांमधील संवादातून उघडपणे दिसून येत आहे. गावाचा रखडलेला विकास, तरुणांच्या हाताला नसलेला रोजगार आणि वर्षानुवर्षे तीच तीच चेहरे सत्तेवर ठेवत असल्याने जनतेत प्रचंड नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर, "आता बदल हवाच!" या भूमिकेतून गावात एक नवीन चेहरा आणि नवीन नेतृत्व पुढे येणे गरजेचे असल्याचा सूर उमटत आहे. यातूनच जुन्या पुढाऱ्यांना शह देण्यासाठी आणि गावाला विकासाची नवी दिशा देण्यासाठी युवा कार्यकर्त्यांची ‘तिसरी आघाडी’ निर्माण होणार असल्याच्या चर्चांनी सध्या संपूर्ण गाव ढवळून निघालं आहे. तरुणांचा निर्धार, पण नेता कोण? गावच्या कट्ट्यापासून ते सोशल मीडियापर्यंत सध्या याच तिसऱ्या आघाडी...

फलटण येथे १७ जुलै रोजी 'संविधान दिंडी'चे भव्य स्वागत; प्रशासकीय व पोलीस अधिकार्‍यांना निमंत्रण

Image
फलटण (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्व ही नैतिक मूल्ये तळागाळातील लोकांपर्यंत रुजवण्यासाठी 'बार्टी पुणे' (विश्वंरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) यांच्या माध्यमातून 'संविधान दिंडी' चे आयोजन करण्यात आले आहे. फलटण येथे आगमन होणाऱ्या या दिंडीच्या भव्य स्वागत कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२६, भीमस्फूर्ती भूमी, मंगळवार पेठ, फलटण आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण स्वागत सोहळ्यासाठी फलटणचे नगराध्यक्ष, सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाला आदरपूर्वक निमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत गोराकुंभार, संत जनाबाई, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार इत्यादी संतांच्या विचारांची मोठी परंपरा व वारसा लाभला आहे. याच अनुषंगाने प्रतिवर्षी आळंदी ते प...

सरडे गावच्या सरपंच पदासाठी राहुल मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा!

Image
गट नेते सुखदेव बेलदार यांच्या भूमिकेकडे संपूर्ण गावाचे लक्ष; राजकीय गणिते बदलणार? सरडे (प्रतिनिधी): तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सरडे गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. यामध्ये 'सरपंच' पदासाठी राहुल लाला मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा गावातील कट्ट्यांवर आणि गल्लीबोळांत रंगू लागली असून, यामुळे सरडे गावच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल लाल मोरे हे राजे गटाचे अत्यंत कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सरडे गावचे गट नेते सुखदेव बेलदार यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या संयमी आणि प्रभावी वक्तृत्वाने गावातील सर्वसामान्य नागरिकांना आपलेसे करणारे एक आश्वासक नेतृत्व म्हणून राहुल मोरे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या नावाला सर्वसामान्य जनतेतूनही चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. सुखदेव बेलदार काय निर्णय घेणार? गावकऱ्यांमध्ये तर्क-वितर्क सध्या सरडे गावात एकच प्रश्न चर्चिला जात आहे—गट नेते सुखदेव बेलदार ...

सरडे ग्रामपंचायत निवडणूक मध्ये वॉर्ड क्र. ४ मधून सौ. शितल निलेश आवटे यांच्या उमेदवारी नावाची चर्चा !

Image
नेते रामभाऊ शेंडगे यांच्या माध्यमातून उमेदवारी निश्चित..? वॉर्डातील अतिक्रमण आणि 'सात-बारा'चा प्रश्न सोडवणार सरडे (प्रतिनिधी): आगामी सरडे ग्रामपंचायत निवडणूक २०२६ चे बिगुल वाजताच स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक ४ मधून एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर येत आहे. सरडे गावचे खंबीर आणि लोकप्रिय युवा नेते रामभाऊ शेंडगे यांच्या माध्यमातून सौ. शितल निलेश आवटे या वॉर्ड क्रमांक ४ मधून उमेदवारी लढवणार असल्याचे चर्चा सुरू आहे, सौ शीतल निलेश आवटे यांच्या नावामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचे पती युवा उद्योजक तर पत्रकार म्हणून ओळखले जातात  सरडे ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये वॉर्ड क्रमांक ४ मध्ये यंदा पहिल्यांदाच अनुसूचित जाती (SC) महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. हे आरक्षण पडल्याने या प्रभागात सुशिक्षित आणि जनमानसात उत्तम संपर्क असलेले निलेश आवटे आणि त्यांच्या पत्नी सौ. शितल निलेश आवटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याच्या चर्चा सुरू आहे.  रामभाऊ शेंडगे यांच्या मार्गदर्...

गुणवंत कामगार राजेंद्र कांबळे राज्यस्तरीय, सेवा दीप समाज गौरव पुरस्कार सन्मानित...

Image
मुंबई, प्रतिनिधी, जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक कवी महासंघ व झुंजार लेखणी आयोजित विशेष सहयोग मैत्री संस्था आयोजित परेल येथे गुणवंत कामगार श्री. राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांना माझी पोलीस महासंचालक व राष्ट्रपती शौर्य पदक विजेते डॉ. सुधाकर सुरडकर राजमाता जिजाऊ यांचे 14 वे वंशज संभाजी राजे जाधवराव व पोलीस मित्र दिलीप नारद यांचे शुभ हस्ते मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मोठ्या थाटात सेवा दीप समाज गौरव पुरस्कार 2026 राज्यस्तरीय देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी मैत्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज भोईर यांनी राजेंद्र कांबळे यांचे कार्याचा पूर्ण आढावा घेतला व त्यांची कार्य पाहून बोलत होते कांबळे यांचे कार्य कौतुकास्पद आहे सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सहकार इत्यादी ठिकाणी त्यांचे मोलाचे सहकार्य आहे अशा व्यक्ती महत्त्वाची निवड करत आहे सामाजिक कार्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्याने त्यांना मागील वर्षी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कडून गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला होता त्यांचे कार्य समाज हिताचे असल्याने ही वेळी त्यांची निवड करण्यात येत आहे. कांबळे यांच्...

दैनिक सांजवात चे फलटण तालुका प्रतिनिधी, आपल्या लेखणीने आणि कर्तृत्वाने समाजमनाचा आरसा बनलेले . अभिषेक सरगर

Image
वाढदिवस विशेष: 'अभिषेक सरगर' – फलटणच्या पत्रकारितेतील एक आश्वासक आणि निर्भीड चेहरा पत्रकारिता हे केवळ एक प्रोफेशन नसून तो समाजाचा आवाज बनण्याचा एक ध्यास आहे, हे फलटण तालुक्यात ज्या काही तरुण पत्रकारांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे, त्यात श्री. अभिषेक सरगर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 'दैनिक सांजवात'चे फलटण तालुका प्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी अत्यंत अल्पकाळात आपली एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.  बातमीपलीकडचा माणूस आणि समाजाचा आरसा अभिषेकजींच्या पत्रकारितेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सत्यनिष्ठता आणि सर्वसामान्यांशी असलेली नाळ. तालुक्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडी असोत, प्रशासकीय अनागोंदी असो किंवा मग तळागाळातील जनतेचे प्रश्न असोत—अभिषेकजींची लेखणी नेहमीच जनतेच्या बाजूने उभी राहिलेली दिसते.   निर्भीड लेखणी: कोणत्याही दबावाला बळी न पडता, बातमीतील सत्य जनतेसमोर आणण्याचे धाडस त्यांनी नेहमीच दाखवले आहे.  सकारात्मक पत्रकारिता: केवळ समस्या मांडून न थांबता, समाजातील चांगल्या गोष्टी, प्रेरणादायी यशोगाथा आणि सामाजिक उपक्रम 'सां...

विजेचा शॉक लागुन ४ जणांच्या मृत्यूप्रकरणी केबलचालका विरुध्द गुन्हा दाखल

Image
प्रतिनिधी नितीन जगताप  फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०८/०७/२०२६ रोजी मौजे खामगाव ता. फलटण जि. सातारा येथे सकाळी ०५.३० वा. सुमारास घराच्या पुढील लोखंडी तारेचा शॉक लागुन एकाच कुटुंबातील १) सतीश ऊर्फ पिसुरडया किसन शिंदे वय ४५ वर्ष, २) गंगु सतीश शिंदे वय ४० वर्ष, ३) सचिन सतीश शिंदे वय २६ वर्ष, ४) आरती सतीश शिंदे वय २४ वर्ष सर्व रा. खामगाव ता. फलटण हे ०४ जण मयत झाले होते. त्याबाबत शितल सचिन शिंदे यांनी दिले तक्रारीवरुन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मयत दाखल करण्यात आले होते. सदर अकस्मात मयताचा पुढील तपास सुरु केला असता सदर तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की फिर्यादी यांच्या घराचे वरुन निष्काळजीपने केबल टाकलेल्या होत्या व त्या केबलवायरला सपोर्ट लावलेली लोखंडी तार हि फिर्यादी यांच्या घरासमोर पडुन त्या तारेला हात लागल्याने वरील चौघांचा जागीच मृत्यु झाला होता. त्यावरुन संबधीत केबल चालक निष्पन्न करुन केबल चालक नामे तात्यासो चंदर लांडगे रा. खामगाव साखरवाडी ता. फलटण याच्या विरोधात फिर्यादी यांनी दिले जबाबावरुन फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस गु.र.क्र. ४०२/२०२६ बीएनएस कलम १०६ ...

विडणी येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी दशरथ बनकरला २० वर्षे सश्रम कारावास; फलटण न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

प्रतिनिधी : नितीन जगताप .  फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मे २०१८ मध्ये घडलेल्या एका धक्कादायक बलात्कार प्रकरणात सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने अत्यंत कठोर निर्णय दिला आहे. न्यायालयाने ३८ वर्षीय आरोपीला दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ बबन बनकर (वय ३८, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) असे सजा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने मे २०१८ मध्ये एका पीडितेवर अत्याचार केला होता. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३३२/२०१८ नुसार भादंवि कलम ३७६, ५०६ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.८ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर निकालतत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. आर. भोळ यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले होते. माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पी. जी. भोसले यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सरकारी पक्षातर्फे ॲड. मिलिंद ओक आणि ॲड. वैभव काटकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. खटल्यादरम्यान ए...

डायमंड टॅलेंट सर्च परीक्षेत यश; इस्रो भेटीसाठी संस्कृती भोसलेची निवड

Image
विक्रम जगताप दहिवडी प्रतिनिधी : स्व. शिलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्यामंदिर, कोळकी (ता. फलटण) येथील विद्यार्थिनी संस्कृती जनार्दन भोसले हिने डायमंड टॅलेंट सर्च परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत इस्रो (ISRO) भेटीसाठी निवड होण्याचा मान मिळवला आहे. माण तालुक्यातील राजवडी गावची कन्या संस्कृतीच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, व्यवस्थापन, पालक तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्कृतीने सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळवले आहे. इस्रोसारख्या देशातील अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्याची संधी मिळणे ही तिच्यासाठी तसेच शाळेसाठी अभिमानाची बाब आहे. यापुढेही संस्कृतीने शैक्षणिक, वैज्ञानिक आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये असेच यश संपादन करून शाळेचे, पालकांचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.

हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Image
फलटण . १ जुलै २०२६ पीराचीवाडी: (ता.फलटण) महाराष्ट्र शासन कृषि विभाग आणि कृषि मित्र शेतकरी स्वयंसहायता समुह यांच्या वतीने, तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी भारती ग्रीन टेक चे संचालक विनय पोळ यांनी बीज संस्करण आणि विवीध जिवाणू संवर्धणांचे किड नियंत्रण व जमिनीच्या सुपीकते साठी महत्त्व तसेच पिकांना त्रासदायक ठरणाऱ्या हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण याविषयी उपस्थीत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी ते म्हणाले की, जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी सेंद्रीय पदार्थाचा अधिकाधीक वापर केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून जमीनी तील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते परिणामी पीका च्या उत्पादन आणि गुणवत्ते मध्ये भरीव वाढ होते.   'एल निनो' हवामान परिस्थीती सावटा च्या पार्श्वभुमीवर स...

खोट्या राजकीय संघर्षात श्रीराम कारखान्याचा बळी देवून शेतकरी-कामगारांच्या चुली विझवू नका....!!

Image
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सदरचा कारखाना चालवावा श्री. नंदकुमार मोरे     राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श्री शरदचंद्रजी पवार साहेब गट) फलटण तालुका   *ज्यांच्या* *कडे क्षमता आहे त्यांच्या* *कडे श्रीराम सहकारी साखर* *कारखान्याचा कारभार* *देणं केव्हाही चांगले आहे* . आज फलटण तालुक्यातील सहकाराची चळवळ काही चुकीच्या धोरणांमुळे मोडकळीस आली आहे व येत आहे.   काहींनी किंवा संचालक मंडळ पैकी कोणी *शिष्टाचार करुन भ्रष्टाचार* केला असेल तर आपल्या कडे *मा. न्यायालय* आहे त्या कडे दाद मागावी किंवा मा *. मुख्यमंत्री* आहेत त्यांच्या कडून ED, CBI ला पाचारण करून चौकशी लावावी , मात्र सदरचा कारखाना बंद पडू नये म्हणून *विशेष* *खबरदारी* घ्यावी.  *फलटणच्या श्रीराम सहकारी साखर* *कारखान्याचा हंगाम जोरदार* व *जोमात* चालू होण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी पुन्हा एकदा *श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर* यांच्या दूरदर्शी प्रजाहितदक्ष व नियोजना खाली चालवण्यासाठी आवश्यक तिथे एकत्र येऊन हंगाम सुरू होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत व पाठिंबा द्यावा,एका बाजूला विवि...