खोट्या राजकीय संघर्षात श्रीराम कारखान्याचा बळी देवून शेतकरी-कामगारांच्या चुली विझवू नका....!!
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सदरचा कारखाना चालवावा
श्री. नंदकुमार मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श्री शरदचंद्रजी पवार साहेब गट) फलटण तालुका
*ज्यांच्या* *कडे क्षमता आहे त्यांच्या* *कडे श्रीराम सहकारी साखर* *कारखान्याचा कारभार* *देणं केव्हाही चांगले आहे* .
आज फलटण तालुक्यातील सहकाराची चळवळ काही चुकीच्या धोरणांमुळे मोडकळीस आली आहे व येत आहे.
काहींनी किंवा संचालक मंडळ पैकी कोणी *शिष्टाचार करुन भ्रष्टाचार* केला असेल तर आपल्या कडे *मा. न्यायालय* आहे त्या कडे दाद मागावी किंवा मा *. मुख्यमंत्री* आहेत त्यांच्या कडून ED, CBI ला पाचारण करून चौकशी लावावी , मात्र सदरचा कारखाना बंद पडू नये म्हणून *विशेष* *खबरदारी* घ्यावी.
*फलटणच्या श्रीराम सहकारी साखर* *कारखान्याचा हंगाम जोरदार* व *जोमात* चालू होण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी पुन्हा एकदा *श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर* यांच्या दूरदर्शी प्रजाहितदक्ष व नियोजना खाली चालवण्यासाठी आवश्यक तिथे एकत्र येऊन हंगाम सुरू होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत व पाठिंबा द्यावा,एका बाजूला विविध विकास पर्व तालुक्यात सुरू असताना काही तरी आडमुठ्या धोरणाचा अवलंब करून हे नको ते नको, मी म्हणेन तसंच हे असले कलगीतुरे व उद्योग बंद करून सदरचा कारखाना कसा चालेल ते पहा मात्र बंद कसा राहील याकडे कोण कोणाच्या माध्यमातून असला फालतूपणा करणार असेल तर *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्री शरदचंद्रजी* *पवार साहेब गट* *कधीच सहन करणार नाही,कारण ७५* % उस *उत्पादक, कामगार वर्ग व सभासद हे* मा *. पवारसाहेब यांना मानणारा* आहे यांत साहेब सुद्धा लक्ष घालतील किंवा मा. केंद्रीय सहकारमंत्री भारत सरकार,मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व साखर आयुक्त यांच्या माध्यमातून मार्ग काढतील मात्र त्यांची अशी अपेक्षा आहे पहिल्यांदा हि *कारखानदारी* *राजकारण विरहित झाली पाहिजे,* सुरु होणे गरजेचे आहे सदरचे संचालक मंडळ, सभासद व कामगार वर्ग ठरवतील विनाकारण काही *राजकीय आखाड्यांचे अडथळे* *आणून काय उपयोग* ...!!
हा *कारखाना* जर *आजारी* पडला तर याला जबाबदार कोण?
हा कारखाना सुस्थितीत चालू ठेवण्यासाठी आजच्या घडीला तरी *श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज* साहेब यांच्या शिवाय पर्याय नाही व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणे गरजेचे आहे.
*फलटण तालुक्यात काही मंडळी सरळसरळ* *सत्ताकारण* , *राजकारणाचे* *विकेंद्रीकरण होत असताना व्यक्तीकेंद्रित* कशी राहिल याकडे पाहत आहे ,हा डाव यशस्वी झाला तर *गुलामगिरी स्वीकारावी लागेल*
, *तालुक्यातील नेत्यांनी आत्ता जनतेचे* *आरोग्य व आर्थिक जीवनमान* *उंचावण्यासाठी* *पुढाकार घ्यावा असं लोकाभिमुख काम* *करावे* ,कोण कोणाच्या *अडून* *कोणाची दुकाने चालवत आहेत हे* लक्षात येईला लागले आहे.
*कारखाना हा सोडून तालुक्यात इतर* *महत्त्वाच्या गोष्टी* *कडे लक्ष केंद्रित केले तर तालुक्यात* *सोन्याचा धूर निघेल हे* संबंधितांनी लक्षात घेऊन *मार्गक्रमण* करावे हि विनंती.
आज तालुक्यात चार साखर कारखाने आहेत यापैकी तीन खाजगी तत्वावर आधारित आहेत एक *सहकारी* तत्त्वावर तो म्हणजे *श्रीराम सहकारी साखर कारखाना* ...!!
या कारखान्याच्या माध्यमातून अनेकांनी आपले हात सुवर्ण द्रव्याने धुतले आहेत.
मध्यंतरीच्या काळात काही वर्ष कारखाना बंद अवस्थेत राहिला त्यामुळं तालुक्यातील या उद्योगधंदे शी निगडित अनेकांना फटका बसला त्या दरम्यान केंद्रीयमंत्री मा. खा.श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब, मा. ना. अजितदादा व मा ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करुन शासनस्तरावर विविध प्रकारच्या निर्णयातून सदर कारखाना सुरू केला तो आजतागायत सुरू आहे.
मात्र काही मंडळींनी कारखाना संदर्भात राजकीय वजन वापरून कारखाना कसा निष्प्रभ व अवसायनात येईल याकडे लक्ष का केंद्रित करीत आहेत, विद्यमान संचालक मंडळ अपयशी किंवा भ्रष्टाचार करीत आहे तर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करावी नाहीतर लुडबुड करणार्यांनी स्वतः प्रतिज्ञापत्र दाखल करून कारखाना चालवावा नाहीतर गुपचूप साखरपुडा करुन जोरदार लग्नाची वरात काढावी..!
विघ्न आणून कोणीही आहेर देणार नाही, भ्रष्टाचार होतोय तर आडवा आडवी करुन जिरवा जिरवी करण्यापेक्षा पुढे या आज कामगार,उस उत्पादक, शेतकरी, संबंधित उद्योगाशी निगडित लोकं याचं अपरिमित नुकसान होत आहे.
येथील शेतकरी व ऊस उत्पादक हा मा.शरद पवारसाहेब प्रेमी आहे.
हे काय तुमचे घरगडी नाहीत,
विद्यमान सरकार माझे आहे, मा. मुख्यमंत्री,मा. सहकार मंत्री व साखर आयुक्त हे माझं ऐकतात हा असला आदरभाव जनतेच्या लक्षात येत आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखाना हा तालुक्यातील सहकारा चे मोठे मंदिर आहे ते सुरक्षित,सुस्थितीत, पारदर्शक कारभार कसा राहील याकडे तालुक्यातील नेत्यांनी, ऊस उत्पादक व कामगार यांना विश्वास बसेल असे जबाबदारीने वागावे.
सिंहावलोकन केल्यास श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सदरचा कारखाना चालवावा असे अनेक जणांना वाटत आहे.
*ध्येय मोठे असेल तर वेळ लागतोच* ..!!
*प्रत्येक संघर्ष तुम्हाला मजबूत बनवत* *असतो म्हणून अडचणींना घाबरू* *नका संयम ठेवा* *आणि प्रयत्न सुरू ठेवा,* *कारण आजचा संघर्ष उद्याचे यश घडवतो* *ती धमक रक्तात* *असावी लागते असं जाणते नेतृत्व म्हणून* *तालुका श्रीमंत रामराजे* *नाईक निंबाळकर यांच्या कडे* *पाहत आहे.*
ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नाही थोडा संयम ठेवा, *हाल होतील पण हार होणार नाही.*
*कारण संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो* ...!!
आपलं सुंदर फलटण.., हरित फलटण...मी फलटण कर
Comments
Post a Comment