सरडे ग्रामपंचायत निवडणूक मध्ये वॉर्ड क्र. ४ मधून सौ. शितल निलेश आवटे यांच्या उमेदवारी नावाची चर्चा !

नेते रामभाऊ शेंडगे यांच्या माध्यमातून उमेदवारी निश्चित..? वॉर्डातील अतिक्रमण आणि 'सात-बारा'चा प्रश्न सोडवणार

सरडे (प्रतिनिधी):
आगामी सरडे ग्रामपंचायत निवडणूक २०२६ चे बिगुल वाजताच स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक ४ मधून एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर येत आहे. सरडे गावचे खंबीर आणि लोकप्रिय युवा नेते रामभाऊ शेंडगे यांच्या माध्यमातून सौ. शितल निलेश आवटे या वॉर्ड क्रमांक ४ मधून उमेदवारी लढवणार असल्याचे चर्चा सुरू आहे, सौ शीतल निलेश आवटे यांच्या नावामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यांचे पती युवा उद्योजक तर पत्रकार म्हणून ओळखले जातात 

सरडे ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये वॉर्ड क्रमांक ४ मध्ये यंदा पहिल्यांदाच अनुसूचित जाती (SC) महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. हे आरक्षण पडल्याने या प्रभागात सुशिक्षित आणि जनमानसात उत्तम संपर्क असलेले निलेश आवटे आणि त्यांच्या पत्नी सौ. शितल निलेश आवटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याच्या चर्चा सुरू आहे.
 रामभाऊ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वॉर्डात मोर्चेबांधणी लवकरच सुरू करणार असून, त्यांच्या उमेदवारीमुळे वॉर्ड क्र. ४ मधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली जाणार आहेत.

विकासकामांचा अजेंडा आणि अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न
आपल्या उमेदवारीबाबत आणि वॉर्डाच्या विकासात्मक भूमिकेबाबत बोलताना निलेश आवटे यांनी वॉर्डातील मुख्य समस्यांवर बोट ठेवले आहे. त्यांनी सांगितले की, "वॉर्ड क्रमांक ४ चा विकास करणे हेच आमचे एकमेव ध्येय आहे. सद्यस्थितीला या भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्याचा मुख्य प्रश्न यामुळे सामान्य नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा मिळण्यात प्रचंड अडचणी येत आहेत. रस्ते, पाण्याचा निचरा आणि मोकळ्या जागा अतिक्रमणांच्या विळख्यात अडकल्या आहेत."

अतिक्रमित जागेवरील नागरिकांना मिळवून देणार 'सात-बारा'
वॉर्डातील सर्वात गंभीर आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे घरांच्या जागांची मालकी. वर्षानुवर्षे अतिक्रमित भागात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या जागेचा अधिकृत उतारा किंवा 'सात-बारा' मिळालेला नाही. निवडणूक जिंकल्यानंतर वॉर्डातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांचा प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवून, गोरगरीब व गरजू लोकांना त्यांच्या हक्काचा सात-बारा कसा मिळवून देता येईल, याकडे त्यांचे विशेष लक्ष असणार आहे.


नेते रामभाऊ शेंडगे यांच्या माध्यमातून सौ. शितल आवटे यांच्या रूपाने एक सक्षम आणि विकासभिमुख चेहरा वॉर्ड क्रमांक ४ ला मिळणार का असे नागरिकांमधून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. पहिल्यांदाच मिळालेल्या या आरक्षणाच्या संधीचे सोने करत, वॉर्डाचा कायापालट करण्यासाठी आवटे कुटुंब व त्यांचे समर्थक आता पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. यामुळे यंदाची सरडे ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची आणि ऐतिहासिक ठरणार हे मात्र निश्चित!

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा