डायमंड टॅलेंट सर्च परीक्षेत यश; इस्रो भेटीसाठी संस्कृती भोसलेची निवड
विक्रम जगताप दहिवडी प्रतिनिधी : स्व. शिलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्यामंदिर, कोळकी (ता. फलटण) येथील विद्यार्थिनी संस्कृती जनार्दन भोसले हिने डायमंड टॅलेंट सर्च परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत इस्रो (ISRO) भेटीसाठी निवड होण्याचा मान मिळवला आहे.
माण तालुक्यातील राजवडी गावची कन्या संस्कृतीच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, व्यवस्थापन, पालक तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संस्कृतीने सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळवले आहे. इस्रोसारख्या देशातील अग्रगण्य अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्याची संधी मिळणे ही तिच्यासाठी तसेच शाळेसाठी अभिमानाची बाब आहे.
यापुढेही संस्कृतीने शैक्षणिक, वैज्ञानिक आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये असेच यश संपादन करून शाळेचे, पालकांचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.
Comments
Post a Comment