जनमानसातील नेतृत्व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर अन् पत्रकार राजेंद्र बोंद्रे यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते!
फलटण: राजकारणात नेते आणि पत्रकार यांच्यात अनेकदा कामापुरतेच संबंध पाहायला मिळतात. मात्र, फलटण तालुक्याचे 'विकास रत्न' आणि कार्यक्षम माजी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे व्यक्तिमत्त्व याला अपवाद आहे. नुकत्याच फलटण येथे संपन्न झालेल्या 'संविधान दिंडी' कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वेगळेच कौटुंबिक आणि आपुलकीचे चित्र पाहायला मिळाले. या सोहळ्यात समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि फलटणचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बोंद्रे यांच्यातील कमालीची जवळीक व स्नेह पुन्हा एकदा अधोरेखित झाला. पत्रकार नव्हे, तर 'कार्यकर्ता' मानणारे नेतृत्व समशेरसिंह नाईक निंबाळकर हे फलटणच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यपद्धतीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे, ते पत्रकारांकडे केवळ बातमीदार म्हणून पाहत नाहीत. पत्रकारिता करतानाच समाजाच्या हितासाठी झटणारा एक 'कार्यकर्ता' म्हणून ते पत्रकारांना आदराचे स्थान देतात. पत्रकार राजेंद्र बोंद्रे यांच्याशी असलेले त्यांचे नातेही याच विश्वासावर आणि प्रेमावर आधारलेले आहे. नगरसेवकांपेक्षाही पत्रकारांना अधिक आपुलकी आणि माया अनेकद...