सांगवीत कायद्याचे धिंडवडे; १० रुपयांत मिळतंय 'मरण', पोलीस प्रशासन झोपले की झोपल्याचे सोंग घेतेय?
सांगवी (प्रतिनिधी): "साहेब, आमचं घर उध्वस्त होतंय, पोराबाळांच्या तोंडचा घास ही दारू हिरावून घेतेय... कुणीतरी वाचवा आम्हाला!" हा टाहो आहे सांगवी गावातील त्या माता-भगिनींचा, ज्यांच्या घराचा उंबरठा आज अवैध दारूमुळे काळवंडला आहे. गावात गल्लीबोळांत फुटलेल्या अवैध हातभट्ट्यांनी सांगवीचा श्वास गुदमरला असून, पोलीस प्रशासनाच्या 'आशीर्वादाने' हा मरणाचा व्यापार जोरात सुरू असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. सांगवी गावात आज परिस्थिती इतकी भयानक झाली आहे की, चहापेक्षा स्वस्त दारू मिळू लागली आहे. अवघ्या १० रुपयांत दारूचा ग्लास हातात पडतोय. ही 'स्वस्त' दारू गरिबांच्या आयुष्याची राखरांगोळी करत आहे. गावातील पारावर, शाळेच्या कोपऱ्यात आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपींचा राबता वाढला असून, सामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. तरुण पिढी या व्यसनाच्या विळख्यात अडकत असताना पोलीस मात्र सोयीस्कर डोळेझाक करत आहेत. गावात कुठे हातभट्टी सुरू आहे, कुठे छुपी विक्री होतेय, हे गावातील लहान मुलालाही माहित आहे; मग खाकी वर्दीला याचा सुगावा का लागत नाही? हा प्रश्न आता सं...