महापुरुषांच्या जयंती उत्सवापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्त करा; अन्यथा तीव्र आंदोलन! - वैभव गीते

NDMG संघटनेचा फलटण नगरपरिषदेला इशारा; धूळ आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

फलटण:
शहरातील मुख्य चौकांमध्ये सुरू असलेली रस्त्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून, यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आगामी काळात येत असलेल्या महापुरुषांच्या जयंती उत्सवांच्या पार्श्वभूमीवर, हे रस्ते तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ‘ नॅशनल दलित मुव्हमेंट (NDMG) संघटनेच्या वतीने फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे  देण्यात आला आहे.
याबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण शहरात सध्या ठिकठिकाणी रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. काम रेंगाळल्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण होत आहे.
उत्सवांच्या काळात अडथळा नको
येणाऱ्या काळात क्रांतिसूर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान महावीर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंत्या मोठ्या उत्साहात साजऱ्या होणार आहेत. या उत्सवांमध्ये भव्य मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, रस्त्यांच्या सध्याच्या दुरवस्थेमुळे मिरवणुका काढणे अशक्य होणार असून, यामुळे भाविक आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
रस्ते दुरुस्ती: जयंती उत्सवापूर्वी सर्व मुख्य चौकातील खड्डे भरून रस्ते सुस्थितीत करावेत.
कामाचा वेग वाढवा: रेंगाळलेली कामे युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांची धुळीच्या त्रासातून मुक्तता करावी: उत्सवाच्या काळात कोणतीही दुर्घटना किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे.
...अन्यथा होणाऱ्या संभाव्य आंदोलनाला आणि परिणामांना प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?