दोन चाकी वाहनांच्या दुरुस्तीतील फलटण मधील 'किंग'; महेश जमदाडे यांचा आज वाढदिवस...
फलटण: प्रतिनिधी मैत्रीच्या दुनियेतील 'राजा माणूस' आणि टू-व्हीलर मेकॅनिक क्षेत्रात आपल्या कौशल्याने वेगळी ओळख निर्माण केलेले महेश जमदाडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पंचक्रोशीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गॅरेज व्यवसायात 'मास्तरकी' महेश जमदाडे यांनी आपल्या गॅरेज व्यवसायाच्या माध्यमातून अल्पावधीतच मोठे नाव कमावले आहे. कोणत्याही कंपनीची दुचाकी असो, त्यातील तांत्रिक बिघाड ओळखण्यात आणि तो चुटकीसरशी दुरुस्त करण्यात त्यांचा हातखंडा आहे. केवळ व्यवसाय न ठेवता, आपल्या ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासल्यामुळे आज पंचक्रोशीतील नावाजलेले मेकॅनिक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. मैत्रीचा 'राजा माणूस' व्यावसायिक कौशल्यासोबतच महेश जमदाडे हे त्यांच्या मनमिळावू स्वभावासाठी ओळखले जातात. 'दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस' अशी त्यांची त्यांच्या मित्रपरिवारात ओळख आहे. संकटाच्या वेळी मित्रांच्या मदतीला धावून जाणे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणे हा त्यांचा स्वभाव गुण अनेकांना भावतो. आज त्यांच्या वाढदिवसा...