बरड येथे ‘बार्टी’च्या संविधान दिंडीचे उत्साहात स्वागत; विविध उपक्रमांद्वारे लोकशाही मूल्यांचा जागर
बरड (प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने आयोजित आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या 'संविधान दिंडी'चे बरड (ता. फलटण) येथे अत्यंत उत्साहीc वातावरणात स्वागत करण्यात आले. बरड येथे आगमन झाल्यानंतर संविधानाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी बरड ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश लंगुटे, ग्रामविकास अधिकारी कर्णे साहेब, ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, भिमरत्न तरुण मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ## संविधानाचा संदेश आणि वारीचे सांस्कृतिक ऐक्य बार्टी, पुणे यांच्या वतीने दरवर्षी आषाढी वारीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत संविधानाची मूल्ये पोहोचवण्यासाठी 'संविधान दिंडी'चे आयोजन केले जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत चालणाऱ्या या दिंडीने बरड नगरीत प्रवेश करताच संपूर्ण वातावरण 'जय विठ्ठल' आणि 'जय संविधान'च्या जयघोषाने दुमदुमून गेले. संविधानाने दिलेली ...